HSC Exam Papers Leaked Case: बारावीचे दोन पेपर फुटल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय; प्राचार्य, केंद्र प्रमुखांना इशारा

Class 12 Paper Leak News update: प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Class 12 Paper Leak News update
Class 12 Paper Leak News updateSarkarnama
Published on
Updated on

HSC Exam Papers Leaked Case: बारावीच्या परीक्षेचे दोन पेपर फुटल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बारावीच्या केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांचा पेपर आधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे घडला नुकताच घडला आहे. त्यानंतर आता परीक्षा बोर्ड अँक्शन मोडवर आले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षां केंद्रावर सीसीटीव्ही लावणे बंधककारण आहे, तसेच हे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्यात संबधित केंद्र प्रमुख, प्राचार्य, समन्वयक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कॅमेरे लावून चालणार नाही, तर परीक्षा कालावधीत होणाऱ्या सर्व घडामोडींचे सातत्याने आणि अखंडित रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक आहे, असे बोर्डाने परीक्षा केंद्र, शाळांना आदेश दिला आहे. अनेक परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्याने शिक्षण विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Class 12 Paper Leak News update
Sharad Pawar News: शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बारामतीतून नव्हे 'या' शहरातून झाली होती...

नागपूरमध्ये 18 फेब्रुवारी हा प्रकार घडला होता. बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स (Physics) आणि केमिस्ट्री (Chemistry) या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला.

Class 12 Paper Leak News update
ECI New Rule: निवडणूक आयोगाचा नवा नियम: ‘हा’ पुरावा असेल तरच मतदान करता येणार

तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्ट फोन आढळला. या फोनमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे आलेली होती. तपासात असे समोर आले की, केवळ 18 फेब्रुवारीचा केमिस्ट्रीचाच नाही, तर 16 फेब्रुवारी रोजी झालेला फिजिक्सचा पेपरही अशाच प्रकारे व्हॉट्सॲपवर प्रसारित झाला असल्याचा तपासात आढळले आहे. याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आलीय . निशिकांत मून आणि फरहान अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com