Badlapur Physical Abuse Case Tushar Apte Resigns Sarkarnama
महाराष्ट्र

Badlapur News: टीकेनंतर भाजपला उपरती : बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचारातील आरोपी नगरसेवकाचा 24 तासांत घेतला राजीनामा

Badlapur Physical Abuse Case Tushar Apte Resigns: चौफेर टीका झाल्यानंतर तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्याचा राजीनामा स्वीकारला आहे. टीकेनंतर भाजपला ही उपरती आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mangesh Mahale

Badlapur News: बदलापुरातील ज्या शाळेत बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले, त्या शाळेचा सचिव तुषार आपटे याच्यावरही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले असल्यावरही त्याची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक केली होती. बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्यानंतर भाजपवर विरोधी पक्षासह चौफेर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

चौफेर टीका झाल्यानंतर तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्याचा राजीनामा स्वीकारला आहे. टीकेनंतर भाजपला ही उपरती आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला नगरसेवक करणे हेच 'पार्टी विथ डिफरन्स'असल्याचा घणाघात विरोधी पक्षाने केला होता. सगळीकडूनच टीका होत असल्याने तुषार आपटे याने आपल्या स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते.

भारतीय जनता पक्षाने अकोटमध्ये एमआयएम पक्षाशी युती केली. त्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाशी जुळवून घेतले. यावरील टीका थांबत नाही तोच बदलापुरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने भाजपवर पुन्हा यू टर्न घेण्याची पाळी आली आहे.

आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने विरोधक काँग्रेस आणि ठाकरे सेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाजपवर तुटून पडले होते. आपटेला भाजपने हे इनाम दिले असल्याची टीका ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत मुंबई काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या सह-आरोपी आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून, आपलं प्राधान्य कशाला आहे, हे दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही या निर्णयावरून भाजपावर घणाघात केला आहे. कुटुंबातल्या मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावरुन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT