Mahapalica Nivadnuk: 400 रुपये रोज, यायला-जायला गाडी अन् एकवेळचे जेवण; गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांनी नेमले मुकादम

Mahapalica Nivadnuk 2026 Women labour Campaigning:पक्षाकडून टोपी, रुमाल आणि पत्रक प्रत्येक महिलांकडे दिले जाते. पदयात्रा सुरू झाली की ते वाटण्याचे काम अन् प्रसंगी घोषणाही त्यांना द्याव्या लागतात. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू आहे.
Mahapalica Nivadnuk 2026 Women labour Campaigning
Mahapalica Nivadnuk 2026 Women labour Campaigning
Published on
Updated on

संदीप लांडगे

Chhatrapati Sambhajinagar News : सत्ताधारी असो की विरोधक सगळेच पक्ष आमच्याकडे महिला पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा दावा करतात. पण या पक्षाचे पितळ उघडे पडते ते रॅली, सभा, मेळावे असतात तेव्हा. कोणत्याही पक्षाला पैसे देऊन लोक आणल्याशिवाय सभा, मेळावे, रॅली गाजवता येत नाही हेच खरे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात पोहचला आहे. गल्लोगली जाऊन प्रचार करायचा म्हटंल तर मागे किमान शंभर दीडशे महिला, पुरूष कार्यकर्ते हे हवेच. पण ते मिळणेही अवघड असल्याने चक्क ग्रामीण भागातील महिलांना शहरात आणले जात आहे.

चारशे रुपये रोज, एकवेळचे जेवण, जाण्या-येण्यासाठी वाहन आणि दररोज फक्त गळ्यातले उपरणे बदलायचे आणि ज्या पक्षांकडून डिमांड त्यांच्यासोबत जायचे, असा दिनक्रम सध्या सुरू आहे. गर्दी जमवण्यासाठी राजकीय पक्षांनी मुकादम नेमले आहेत. तो प्रति महिला, व्यक्तीसाठी पैसे घेतो आणि त्यातून आपले कमिशन कपात करून साधारणत:चारशे रुपया प्रमाणे पैसे दिले जातात. सकाळी साडे-आठ ते नऊ पर्यंत या महिलांना घेऊन शहरात गाड्या दाखल होतात. दहा वाजेपासून त्या मुकादमाने सांगितल्या प्रमाणे त्या त्या पक्षाच्या रॅलीत सहभागी होतात.

शेतीमध्ये सध्या फारसी कामे नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही मोठ्या प्रमाणात शहरात उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. पक्षाकडून टोपी, रुमाल आणि पत्रक प्रत्येक महिलांकडे दिले जाते. पदयात्रा सुरू झाली की ते वाटण्याचे काम अन् प्रसंगी घोषणाही त्यांना द्याव्या लागतात. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कमी वेळात प्रभागातील आपल्या वार्डांची दुसरी-तिसरी फेरी पूर्ण करण्याकडे उमेदवारांचा कल आहे.

Mahapalica Nivadnuk 2026 Women labour Campaigning
Mahapalika Nivadnuk: कोल्हापुरच्या आखाड्यात 100 हून अधिक कोट्यधीश 'पहिलवान' भिडणार

'आम्ही दहा-पंधरा जणी एकत्र येतो. सकाळी नऊला वाहन येते, दुपारी चारपर्यंत थांबायचं. चारशे रुपये हातात मिळतात. शेतात राबून तेवढेच पैसे मिळतात, मग हेच बरं नाही का? जेवण देतात, वाहनानं आणतात-नेतात. झेंडा हातात घेऊन गल्लीबोळात पाम्फलेट वाटायचं, थोडं ओरडायचं...बस्स. अजून काय पाहिजे?’ ग्रामीण भागातून आलेल्या एका महिलेने या सहज बोलण्यातून सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रचारामागचं वास्तव मांडले.

एका महिलेला साधारण चारशे रुपये रोज दिले जात असून, दोनशे रुपये मुकादमाला मिळतात. वाहनभाडे वेगळे दिले जाते. सकाळी ठरावीक ठिकाणाहून महिलांना वाहनात बसवून शहरात आणले जाते. संबंधित पक्षाचा किंवा उमेदवाराचा झेंडा हातात देऊन प्रचार साहित्य वाटप, घोषणा देणे, फेरीत चालणे, गल्लीबोळात फिरणे अशी कामे त्यांना दिली जातात. दुपारी जेवणाची सोयही केली जाते. दुपारी चारच्या सुमारास पुन्हा त्याच वाहनातून महिलांना गावाकडे सोडले जाते.

Mahapalica Nivadnuk 2026 Women labour Campaigning
Chandrakant Patil: पिंजरा ते नटसम्राट! दोन्ही पाटलांमध्ये जुंपली; जयंतरावांची अवस्था नटसम्राटासारखी...

गर्दीतून शक्तीप्रदर्शन..

उमेदवाराच्या मागे किती लोकं आहेत, किती गर्दी जमते, हे दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो. जास्त माणसे म्हणजे जास्त ताकद, असा समज राजकीय वर्तुळात रुजलेला आहे. त्यामुळे काही पक्ष तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर हा मार्ग महापालिका निवडणुकीत अवलंबत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे ग्रामीण महिलाही या कामाकडे मजुरी म्हणूनच पाहत आहेत. शेतमजुरीपेक्षा कमी कष्टाचे आणि तेवढ्याच पैशाचे काम म्हणून त्या प्रचाराला येत आहेत. मात्र, लोकशाही प्रक्रियेत अशा 'भाडोत्री गर्दी'मुळे प्रचाराचे स्वरूप बदलत असून, खरा जनाधार आणि दिखावा यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com