Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Video Uddhav Thackeray : बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे कडाडले, '...मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचा, क्षमता नसलेला माणूस'

Roshan More

Uddhav Thackeray News : बदलापूर मधील चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर मोठा उद्रेक झाला. नागरिकांनी बदलापूरमध्ये मोठे आंदोलन केले. मात्र, बदलापूरमध्ये आंदोलन करणारे बाहेरचे लोक होते. लाडकी बहीण योजनेमुळे पोटसूळ उठला असल्याने राजकारण करत हे आंदोलन केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेय 'त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणलेली ही लाडकी बहीण योजना नव्हती. हे दुष्कृत आहे, विकृती आहे. यात जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत मानसिकतेचे आहेत.' या शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात केला.

एकाद्या घटनेचा निषेध करणे हे कधीपासून राजकारण वाटायला लागले. मुख्यमंत्र्यांना बदलापूरची घटना मान्य आहे का? क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला आहे. त्यांना जनतेशी काही देणघेणं नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.

कोणतेही राजकारण यात नाही. सुरक्षित बहीण असली पाहिजे तर लाडकी बहीण योजना आणू शकतो. जेव्हा हे घडत होते तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते. ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधून घेत होते. राख्या बांधून घेणारे हात बहिणीचे रक्षण करत नसतील तर काय कामाचे.कोरनासारखा हा महाराष्ट्रात विकृतीचा व्हायरस आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी फटकारले.

बंदची हाक

महाविकास आघाडीकडून शनिवारी (ता.24) बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मुलगी शाळेत शाळेत सुरक्षित नसेल तर मोफत शिक्षणाचा उपयोग काय?जनतेच्या उद्विग्नतेला वाचा फोडण्यासाठी बंद करतो आहोत.राजकीयच नाही तर सर्वांनी यात सामील व्हायला हवे.

पोलिस आयुक्त डुंबरे यांनी सांगायला हवा की त्यांच्यावर दबाव होता की नाही. मुलींच्या पालकांच्या दखल घेतली असती तर जर जनतेचा उद्रेक झाला नसता. याला राजकारण म्हणणं मान्य नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT