Ambadas Danve News : केंद्रीय कृषीमंत्री आले अन् गेले, शेतकऱ्यांचे प्रश्न जसै थे..

Ambadas Danve criticizes Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan : शिवराज सिंग चौहान जी, आपण काल त्या बीड जिल्ह्यात होतात जिथे मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. त्याबद्दल आपल्यासह कोणीही चकार शब्द मात्र काढला नाही. तुमचे केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील असल्याचा आव आणणारे आहे, हे यातून स्पष्ट झाले!
Central Agriculture Minister shivraj singh chauhan-Ambadas Danve
Central Agriculture Minister shivraj singh chauhan-Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री ज्या बीड जिल्ह्यात आले होते, त्याच जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यावर ते काही बोलतील, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस यावर उपस्थीत सगळ्याच नेत्यांनी भाषण ठोकली.

केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी या विषयावर दिल्लीत बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, पण ते कधी पुर्ण होणार? हा खरा प्रश्न आहे. (Shivsena) शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून केंद्रीय कृषी मंत्र्यांसह राज्य सरकारला फटकारले आहे. या संदर्भात खोचक ट्विट करत अंबादास दानवे यांनी निशाणा साधला.

शिवराज सिंग चौहान जी, आपण काल त्या बीड जिल्ह्यात होतात जिथे मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. त्याबद्दल आपल्यासह कोणीही चकार शब्द मात्र काढला नाही. तुमचे केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील असल्याचा आव आणणारे आहे, हे यातून स्पष्ट झाले! मोदींनी 65 पिकांच्या 109 प्रजातींचे बियाणे लॉन्च केले आहे जे कमी पाण्यात, कमी दिवसांत उत्पादन देते असे आपण म्हणालात.

Central Agriculture Minister shivraj singh chauhan-Ambadas Danve
Ambadas Danve News : जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यासाठीच पडताळणी समित्या काम करतात का ?

मग ही बियाणे काळी की गोरी आहेत हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना बाजारात दिसू द्या! (Ambadas Danve) काल परळीत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेली सगळ्या वक्त्यांची भाषणे फक्त कांदा, सोयाबीन, कापूस, युरिया, डीएपी, हमीभाव, ड्रोन, नॅनो युरिया याबाबतच्या अडचणी कथन करत होती. किमान हे प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आहेत, हे जाणवायला तरी लागले यांना.

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आल्यासरशी यातील एकही प्रश्न सोडवला नाही मात्र, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यासह उपस्थितीत राज्यातील मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सव भरवण्याची पंरपरा धनंजय मुंडे यांनी कायम राखल्याची चर्चा या निमित्ताने परळीत सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com