Sunetra Pawar election campaign start: बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग बंद झाला आहे. काँग्रेस उमेदवार दिला आहे. काँग्रेसने जरी माघार घेतली तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे नियोजन केले असून बैठकांचा सिससीला सुरू झाला आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपला प्रचाराला सुरुवात करतील.
कन्हेरी गावातील हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या प्रचाराचा नारळ फोडतील. बारामती विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी ताकद लावणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारखी 9 एप्रिल आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार हे गुरुवारी (9 एप्रिलला) स्पष्ट होईल. काँग्रेस माघार घेणार की निवडणुकीच्या मैदानात लढणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुरुवारीच निवडणुकीच्या मैदानात कोण कोण असणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.