Baramati By Election : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन पण जय पवारांचा वेगळाच प्लॅन, बारामतीच्या राजकारणात ट्विस्ट!

Jay Pawar Strategy NCP Meeting : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जय पवार यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Jay Pawar Sunetra Pawar
Jay Pawar Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये बारामतीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक मैदानात उतरणार आहेत. सहा एप्रिला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घडामोडी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी मधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा निश्चित केला आहे. याबाबत केंद्रातील नेत्यांनी देखील सकारात्मकता दर्शवली असल्याचं सांगितले जात आहे.

त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होईल अशी शक्यता मावळली असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समर्थन मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंब्याची मागणी करण्यासाठी फोन केला असल्याचे सांगितले जात आहे.मात्र याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

Jay Pawar Sunetra Pawar
Baramati By Election: बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक; काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट

अशातच जय पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून आज सायंकाळी चार वाजता त्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत देखील जय पवार यांनी बारामती मधून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता ते आपल्या आईसाठी देखील मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका व बारामती शहर आढावा बैठक जय पवार यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बैठकीला बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, बूथ कमिटीतील सर्व पदाधिकारी, समन्वयक, युवक, महिला पदाधिकारी यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा, बारामती येथे आज सायंकाळी चार वाजता ही बैठक पार पडणार आहे.

काँग्रेस लढणाऱ्यावर ठाम

एकीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि दुसरीकडे काँग्रेसने घेतलेला भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घ्यायची नाही या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jay Pawar Sunetra Pawar
Baramati byelection : सुनेत्राकाकींनी अर्ज दाखल करताना बोलावलं तर नक्की जाईल : पवार कुटुंबाच्या एकीसाठी सरसावले युगेंद्र पवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com