New Delhi News: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी(ता.15) तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची व बारामती या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर 4 मेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर रोजी निधन झालं होतं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तसेच दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान दुर्घटनेत निधन झालं होतं. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.
आता राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणुकांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीची विधानसभेची जागा सुनेत्रा पवार लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यात पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत.
त्यानुसार, प. बंगालमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होत असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच निकाल हा 4 मेला जाहीर केला जाणार आहे. ही घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.