Beed Murder case Sarkarnama
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येत राजकीय कनेक्शन, नेत्याच्या पुतण्याचा सहभाग?

Beed Yash dhaka Murder Case : यश ढाका हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून त्याच्या कुटुंबीयांनी या हत्येमध्ये राजकीय नेत्याचा सहभागाचा आरोप केलाय.

Roshan More

Beed Crime : गुन्हेगारी घटनांमुळे बीड पुन्हा चर्चेत आले आहे. मागील आठवड्यात बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या मुलाचा काही तरुणांनी घेरून हत्या केली होती. या हत्येनंतर ढाका यांचे नातेवाईक संतापले होते. मृतदेह देखील ताब्यात घेण्यास नकार देत भरपावसात त्यांनी रस्ता रोको केला. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला असून या हत्येमागे मोठ्या नेत्याचा पुतण्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले की, 'एक अतिशय लहान वयाच्या मुलाचा भर रस्त्यात खून कोणी कसा करू शकते. मी त्या मुलाच्या काकांशी आणि बहिणीशी बोलले. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे कोणी एका नेत्याच्या पुतण्याने के कृत्य केले आहे.'

हत्येनंतर पोलिसांनी सुरज काटे नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले होते. तसेच चार जणांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान,किरकोळ कारणावरून निर्घुणपणे हत्या केल्याचं सांगितले जात आहे. संशयितांनी धारधार शस्त्राने यश ढाका यांच्यावर केले.

अंजली दमानिया यांनी सांगितले की, मृत तरुणाच्या घरच्यांना एफआयआरसुद्धा करायला त्रास झाला. त्यांनीच ही माहिती आपल्याला दिला. तसेच . आपण राजस्थानच्या एका गावात होते म्हणून माझा फोन त्यांना लगत नव्हता. मी मुंबईत परत येणार आहे. एसपी सारांशी पण बोलते. मला होईल तेवढी पूर्ण मदत मी करणार आहे, असे देखील त्या म्हणाल्या.

हत्येचा व्हिडिओ व्हायरल

यश याच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही तरुण त्याला मारताना दिसत आहेत. दरम्यान, यश याचा वाल्मिक कराडसोबतचा देखील व्हिडिओ व्हायर झाला असून त्यामध्ये धमकी देणारा ऑडिओ आहे. एडीट करून तो लावण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT