
प्रशासनाला अनावश्यक त्रास नको – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सतत फोन करून अधिकाऱ्यांना अडकवू नका, कारण पूरपरिस्थितीत ते 24 तास काम करत आहेत, असे स्पष्ट केले.
राजकारण बाजूला ठेवा – महायुतीसह सर्व पक्षांनी श्रेयवाद टाळून पूरग्रस्तांना मदत करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशनाची मागणी फेटाळली – काही नेत्यांनी मागितलेल्या एकदिवसीय अधिवेशनावर गोरे यांनी सध्या मदत हेच प्राधान्य असून अधिवेशनाऐवजी प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
Solapur, 29 September : प्रशासकीय यंत्रणा कामात असताना त्यांना त्रास देऊन अडकवून ठेवणं योग्य नाही. प्रशासकीय व्यवस्थेतील लोकं 24 तास काम करत आहेत. एकाच वेळी सर्व ठिकाणी पोहोचणे अवघड आहे. पण संबंधित यंत्रणेचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी आपण सर्वजण मिळून घेतली पाहिजे. श्रेयवाद हा विषय बाजूला ठेऊन काम करूयात, अशा कानपिचक्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला वारंवार फोन करणाऱ्या महायुतीमधील मित्रपक्षाच्या नेत्यांना दिल्या.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा जिल्हाधिकारी यांच्यासोबतचा संवाद सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल हेात आहे. त्यात ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) यांनी प्रशासनाला कारण नसताना त्रास देऊ नका, अशी तंबी दिली.
गोरे म्हणाले, मी पालकमंत्री (Guardian Minister) असून तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बोलावता आलं असतं. पण पूर आल्यापासून एकाही तालुका अधिकाऱ्याला बोलावून घेतलं नाही. वेळ पडली तर व्हिसीद्वारे संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेतली. पण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, प्रशासकीय यंत्रणा रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करत आहे. त्यामुळे आपण थोडसं समजून घेतलं पाहिजे.
मी एखाद्या ठिकाणी जाणं आणि तेथून लगेच फोन लावणं. इथं का पोचला नाही. सगळ्याच ठिकाणी मंत्री, कलेक्टर आणि तहसीलदार पोचू शकत नाहीत. पण खालची यंत्रणा नक्की पोचते. गावपातळीवरील यंत्रणा प्रत्येकापर्यंत जाऊन पोचते, असेही पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे म्हणाले, अनेक राजकीय पक्षाचे नेते सोलापूर जिल्ह्यात येत आहेत, यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण न करता पूरबाधित लोकांच्या पाठीशी उभे राहूया, अशी विनंती मी सर्व राजकीय मंडळींना करतो. संबंधित यंत्रणेचे खच्चीकरण होणार नाही, याची काळजी आपण सर्वजण मिळून करूयात.
निवडणूक लागेल, तेव्हा आपण राजकारण करू. मात्र आता सर्वांनी सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रशासनाला मदत केली पाहिजे आणि कोणी मदत करू शकत नसेल तर राजकारण न करता शांत राहावे. श्रेयवाद हा विषय बाजूला ठेऊन काम करूयात, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले आहे.
पूरग्रस्तसाठी एक दिवसीय अधिवेशन मागणी काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यावर गोरे म्हणाले, आपण कोणत्यावेळी काय बोलावं हे समजून घेतलं पाहिजे. आता लोकांच्या मदतीला गेलं पाहिजे की अधिवेशन घेतलं पाहिजे, कारण अधिवेशन घेतलं तरी सरकार निर्णय घेतं आणि नाही घेतलं तरी सरकारच निर्णय घेणार आहे, त्यामुळे राजकारण न करता आपण सर्वांनी मदतीसाठी एकत्र आलं पाहिजे.
प्र: जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला काय विनंती केली?
उ: पूरस्थितीत 24 तास काम करणाऱ्या यंत्रणेला अनावश्यक फोन करून त्रास देऊ नका.
प्र: त्यांनी राजकीय नेत्यांना काय संदेश दिला?
उ: श्रेयवाद व राजकारण न करता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र या.
प्र: एकदिवसीय अधिवेशनाबाबत त्यांची भूमिका काय होती?
उ: सध्या अधिवेशन नको, प्रत्यक्ष मदत महत्त्वाची आहे.
प्र: गोरे स्वतः अधिकाऱ्यांशी कसे संवाद साधत आहेत?
उ: व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आवश्यक माहिती घेत आहेत, प्रत्यक्ष बोलावलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.