Nana Patole and Devendra Fadanvis
Nana Patole and Devendra Fadanvis Sarkarnama
महाराष्ट्र

राज्यात पडणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसच! : नाना पटोलेंचे गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

पुणे : मागच्या काही काळात राज्यातील आघाडी सरकारमधील (Mahavikasa Aghadi) मंत्र्यांवर भाजपकडून (BJP) वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रताप सरनाईक अशा नेत्यांमागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि छाप्यांचे सत्र सुरु आहे. त्यातच नांदेडमधील काँग्रेस नेत्यांवर ईडी पुढची कारवाई करणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अर्थात त्यांचा रोख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता. मात्र या सगळ्या कारवायांमागे राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadanvis) असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

'सरकारनामा'ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये नाना पटोले बोलत होते. राज्यातील सध्याच्या कारवायांमागे भाजपचा कोणता नेता असू शकतो का असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर पटोले म्हणाले, सगळेच नेते आहेत. पण पहाटेला शपथ घेणारे सगळ्यांनाच ठावूक आहेत. त्यांचे मंत्रीमंडळ झाले, त्यांचे ८० तासांचे सरकार हा महाराष्ट्रासाठी एक इतिहासच आहे. आता तर त्यांना दिवसादेखील स्वप्न पडत आहेत. ते सातत्याने दिल्लीला जावून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटत असतात. तेच या कारवायांच्या मागे आहेत.

किरीट सोमय्या म्हणजे मनोरंजन :

किरीट सोमय्या म्हणजे राज्याचे मनोरंजन आहे, अशी खिल्ली नाना पटोले यांनी उडवली. ते म्हणाले, किरीट सोमय्यांना आरोप लावण्यासाठी सुसाट सोडले आहे. त्यांना काय बोलतो, काय नाही, कुठले पुरावे दाखवतो याला काही तथ्य नसते. ते राज्याला केवळ मनोरंजन देण्याचे काम करतात. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर ही आरोप केले होते. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. मात्र न्यायालयानेच त्यांना निर्दोष सोडले. म्हणूनच सोमय्यांच्या आरोपांना तथ्यहिनच म्हंटले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT