NCP MLA Abhijit Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मंत्रिपदाच्या ऑफरवर शरद पवारांच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले,'पांडुरंगाच्या मनात असेल तर..'

Solapur Politics News : सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. त्यामुळे महायुतीमधील सर्वच पक्षांचा त्यांच्यावर लक्ष आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : ‘पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळ्या गोष्टी होतील, असं म्हणत मंत्रिपदाच्या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी थेट काही दिवसांपूर्वी पाटील यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांच्या या विधानाने सस्पेन्स वाढला आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरला आलेल्या मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना मंत्रि‍पदाची ऑफर दिली होती. या ऑफरवर आमदार अभिजीत पाटील म्हणाले, ‘पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळ्या गोष्टी होतील. मला मंत्रिपदाची ऑफर दिली जाते. हे माझ्यासाठी फार मोठे आहे. सोलापूर जिल्हातील राष्ट्रवादीच्या 4 आमदाराच्या बाबतीतच शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चा घडत आहेत. मात्र चर्चा चुकीच्या आहेत’.

शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत हातमिळवणी करणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर अभिजीत पाटील म्हणाले, सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहेत. मात्र पक्षात अद्याप तरी अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र पक्ष निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेईन’. असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणावर आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात बिहार सारखे प्रकार घडू नयेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्याचे पालकमंत्रिपदाची धुरा घ्यावी. तसेच राज्यभरातील गुन्हेगारी नेस्तनामूत करुन जरब बसवण्याची गरज आहे’.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT