Bhaskar Jadhav On BJP And CM Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : 'बाळासाहेबांचे निधन होताच भाजपने वेळ साधली अन् फडणवीसांनीच...'; भास्कर जाधवांचे गंभीर आरोप

Bhaskar Jadhav On BJP And CM Devendra Fadnavis : शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिना निमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात भास्कर जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली.

Aslam Shanedivan

Mumbai News : गेल्या अडीच ते तीन चार वर्षांमध्ये शिवसेनेवर अनेक संकटे आली असून ती आपल्याच लोकांनी आणली. ज्यांच्याबरोबर 35 वर्षे मैत्री केली. ज्यांचा नामोल्लेख सुद्धा राज्यात नव्हता. ज्यांनी शिवसेनेची करंगळी धरून राज्यात वाटचाल केली. ते आज राज्याचे नाही तर देशाचे राजकर्ते बनवसले आहेत. तेच भाजपवाले आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायला निघाले आहेत. ते उद्धव ठाकरेंना गुडघे ठेकायला लावण्याचे प्रयत्न करत आहे. पण हे शक्य नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

बाळासाहेबांनी देशात पहिल्यांदा देशांमध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली. त्यांच्या विचाराणे प्रेरित होऊन भाजप राज्यात आली. शिवसेनेता हात धरून ती देशाच्या तख्तापर्यंत गेली. तीच भाजप आज भांडण लावण्याचे काम केलं. तर ज्यावेळी बाळासाहेबांचा मृत्यू झाला तिच वेळ भाजपने साधली. त्याच वेळी भाजपने शिवसेना संपवण्याची वेळ असल्याचे म्हणत कोणतेही कारण नसताना 2014 मध्ये युती तोडली. फक्त युतीच तोडली नाही. तर देशात जेथे जेथे सत्ता होती. तेथील पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचार केला. भाजपने अचानक विश्वास घात केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हार न मानता एकट्याच्या जिवावर 63 आमदार निवडून आणल्याचे जाधव म्हणाले.

तर जे आज देशाचे गृहमंत्री आहेत ते अमित शाह युती करण्यासाठी मातोश्रीवर चक्रा मारत होते. त्यांनी युती होताना कोणतीच चर्चा झाली नाही, असे म्हटलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खोटारडेपणा समोर आणला. त्यांनी 2019 आपल्या मुलाखतीत पहिल्यांदा जगासमोर सत्य ठवले. तर ज्यांनी आमच्यावर आरोप केले की, आम्ही हिंदुत्व सोडलं, काँग्रेससोबत गेलो. त्यांनी काय केलं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी केली आणि 80 तासाचं सरकार आणलं.

त्यामुळे शिवसेनेच्या पाठीत पहिल्यांदा खंजीर खूपण्याचे काम कोणी केलं असेल तर ते भाजपच्या फडणवीस यांनी. युती तोडण्याचे पाप फडणवीस यांनी केलं. तर त्याचे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले. त्यामुळेच त्यावेळी त्यांचे 80 तासांचे सरकार पाडलं गेल्याचा दावा यावेळी जाधव यांनी केला.

तसेच जाधव यांनी राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट उद्धव ठाकरे यांनी पेललं. त्यातून आपण बाहेर पडतो ना पडतो तोच त्यांना गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी देखील संधी साधू भाजपने आपली खेळी खेळी. उद्धव ठाकरेंच्या शिलेदांवर चौकशी आणि धाडी सुरू केल्या. यामुळे काही लोक घाबरले आणि त्यांच्याबरोबर जाऊन बसले. पण संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यासारख्यांनी यांना भिक घातली नाही. पण आजची लढाई सोशल मीडियाची आहे. बुद्धिची आहे आणि बुद्धिची लढाई ही बुद्धीनेच लढून जिंकावी लागणार आहे. यामुळे राऊत आणि देशमुख यांनी लिहलीली पुस्तकं आपल्याला वाचावी लागतील असेही आवाहन जाधव यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

तर यावेळी त्यांनी भाजपला इशारा देताना, भाजपने कितीही नामोहरण करण्याचा, गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला, कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे त्यांच्या समोर गुडघे टेकणारे किंवा साधा चेहरा सुद्धा पाडणारे नाहीत हे लक्षात घ्यावं. तर जे आता भाजपबरोबर जात आहेत ते स्वच्छ होतात शुद्ध होतात म्हणून जात आहेत. पण तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी शिवसेनेला झुकवू शकणार नाही असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT