Bhaskar Jadhav: 'आम्हाला एबी फॉर्म देऊन वाऱ्यावर सोडता,मग लढायचं कसं?'; उद्धव सैनिकांनी भास्कर जाधवांनाच धारेवर धरलं

Vidarbha Politics : विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव सेनेसाठी एकही जागा सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. भाजपसोबत युती असताना दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेसाठी सोडला जात होता.
Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
Bhaskar jadhav Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महापालिका निवडणुकीची तयारी आणि आढावा घेण्यासाठी नागपूरला आलेल्या उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनाच उद्धव सेनेच्या सैनिकांनी पेचात टाकले. आम्ही कशाच्या बळावर लढायचे? पक्ष पैसे लावत नाही, सभा, बैठका घेत नाही, प्रचाराला कोणी येत नाही, उमेदवारांना एबी फॉर्म देऊन वाऱ्यावर सोडून देता असा सवाल सैनिकांनी करून पक्षच्या धोरणावर आपली नाराजी व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे नियोजन, तयारी, उमेदवारांची निवड करण्यासाठी उद्धव सेनेच्यावतीने एक नेता एक शहर अशी रचना करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेची जबाबदारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याकडे सोपवली आहे. त्यापूर्वी पक्षाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शहरातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचे निर्देश दिले होता.

या सर्वांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव नागपूरला आहे. त्यांनी सायंकाळी रविभवन येथे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत राहायचे की स्वबळावर निवडणूक लढायची अशी विचारणा उपस्थितांना केली. स्वबळावर लढायचे असले तर आतापासूनच सर्व 151 जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

महाविकास आघाडीत राहून लढायचे असले तर आपली ताकद कुठे आहे आणि किती जागा मागायच्या याचाही निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे असे सांगितले. याबाबत त्यांनी शिवसैनिकांचे मते जाणून घेतली. यानंतर त्यांनी इच्छुकांना बायोडेटा सादर करण्यास सांगितले. या दरम्यान, काही शिवसैनिकांनी निवडणूक लढायची तयारी दर्शवली. मात्र, आम्हाला एबी फॉर्म देऊन वाऱ्यावर सोडून देऊ नका अशी सूचना केली.

Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
Santosh Deshmukh News: संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्वात महत्त्वाची अपडेट; गंभीर आरोपांनी खळबळ, देशमुख कुटुंबियाचा मोठा निर्णय

सोबतच निवडणुकीसाठी लागणाऱ्या खर्चाचे काय असा सवालही केला. भास्कर जाधव यांनी यावेळी पक्ष निवडणूक लढण्यासाठी पैसे लावत नाही असे स्पष्टच सांगून टाकले. ज्यांना कोणाला लढायचे आहे त्यांनी आपल्या ताकदीवर लढावे, पैसे खर्च करावे असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावल्याचे समजते.

विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव सेनेसाठी एकही जागा सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे मोठा असंतोष उफाळून आला होता. भाजपसोबत युती असताना दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेसाठी सोडला जात होता. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर उद्धव सेनेकडून हा हक्काचा मतदारसंघही काँग्रेसने हिरावून घेतला आहे.

Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
Nagpur BJP vs Congress : काँग्रेसचे भोयर यांचा बावनकुळेंवर बेईमानीचा आरोप; भाजप संतापली म्हणाली...

2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा महापालिकेच्या निवडणूक मित्र पक्षांना वाटा देण्यास विरोध आहे. काँग्रेसने आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहे. हे बघता उद्धव सेनेला स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com