Bhupendra Yadav  sarkarnama
महाराष्ट्र

Video BJP Politics : भाजप लागले कामाला, महाराष्ट्राच्या प्रभारी पदी भुपेंद्र यादव

Bhupendra Yadav BJP incharge of Maharashtra : भाजपकडून महाराष्ट्राच्या प्रभारी पदी भूपेंद्र यादव यांची नियुक्त केली आहे तर, अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

Roshan More

BJP Politics : भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज (सोमवार) भाजपकडून महाराष्ट्राच्या प्रभारी पदी भूपेंद्र यादव यांची नियुक्त केली आहे तर, अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

लोकसभेमध्ये महाराष्ट्रात झालेल्या पराभवामुळे भाजपकडून मोठे संघटनात्मक बदल केले जातील, याचे संकेत दिले जात होते. प्रभारी पदी यादव यांची नियुक्ती करून त्याची सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रासोबत हरियाणाची विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणासाठी देखील निवडणूक प्रभारी म्हणणारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान Dharmendra Pradhan यांची नियुक्ती केली आहे. तर, बिप्लब कुमार देब सहप्रभारी असणार आहे.

झारखंड आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यासाठी झारखंडच्या प्रभारी पदी शिवराजसिंह चौहान Shivraj singh chauhan यांची तर, हेमंत विश्व सरमा यांची सहप्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची जम्मू काश्मीरच्या प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

भाजपकडून सर्वे

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयश कशामुळे याचा अभ्यास लोकसभा मतदारसंघ निहाय भाजपकडून केला जातो आहे. त्यासाठी 48 मतदारसंघामध्ये भाजपकडून निरीक्षक नेमले आहेत. शिवाय विधानसभेसाठी 288 मतदारसंघांचा सर्वे केला जात असल्याच्या चर्चा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT