Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : आघाडीच्या गोटातून मोठी अपडेट; मुंबईत ठाकरेंचा वाटा मोठाच; 36 पैकी...

Political News : महाविकास आघाडीतील घटक पक्ष गेल्या तीन दिवसापासून चर्चा करीत आहेत. त्यामध्ये राज्यातील जवळपास 288 पैकी 250 जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित 38 जागांवर दोन किंवा तीन पक्षाने दावा केला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष गेल्या तीन दिवसापासून चर्चा करीत आहेत. त्यामध्ये राज्यातील जवळपास 288 पैकी 250 जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित 38 जागांवर दोन किंवा तीन पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे तीन पक्षांत चर्चा करून वाद सोडवला जाणार आहे. त्यातच मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला आहे. यामध्ये सर्वधिक जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मिळाल्या आहेत. (MVA News)

मविआच्या बैठकीत मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शिवसेना 13 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाला 1 जागा मिळाली तर समाजवादी पक्षाच्या वाट्यालाही एक जागा आली आहे.

या जागावाटपानुसार घाटकोपर पूर्व जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजी नगरची जागा समाजवादी पार्टीला सोडण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला मिळालेल्या जागा पुढीलप्रमाणे : विक्रोळी, भांडुप पश्चिम, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चेंबुर, कलिना, वरळी, शिवडी या जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसच्या वाट्याला मालाड पश्चिम, धारावी, मुंबादेवी, वांद्रे पश्चिम, चांदीवली, कांदिवली पूर्व, वांद्रे पुर्व या जागा आल्या आहेत. उरलेल्या 13 जागांवर दोन किंवा तीन पक्षांचा दावा आहे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरु आहे. येत्या काळात या वाद असलेल्या जागांवर लवकरच तिढा काढण्यात येईल असे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT