MVA News : मेव्हुण्या-पाहुण्याच्या वादात पवार-ठाकरेंच ठरलं; ‘या’ उमेदवाराला मिळणार राधानगरीत संधी

Political News : महायुतीचे संभाव्य उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रकाश आबिटकर यांची हॅट्रिक रोखण्यासाठी ठाकरे गट कोणता चेहरा समोर आणणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
A Y Patil and KP Patil
A Y Patil and KP PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कोणाला संधी देणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याचे जवळपास निश्चित आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रकाश आबिटकर यांची हॅट्रिक रोखण्यासाठी ठाकरे गट कोणता चेहरा समोर आणणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

महायुतीतून आघाडीवर हात ठेवलेले माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांची आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र नुकतीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील मातोश्री येथे आढावा बैठक घेतल्यानंतर पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारीवरून हालचालींना वेग आला आहे.

मेव्हण्या-पाहुण्याच्या वादात राधानगरीतील महाविकास आघाडीचा उमेदवार हेरला असून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारीची माळ ही ए. वाय. पाटील यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारी मिळवण्यावरून स्पर्धा सुरू आहे.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागील सहा महिन्यांपासून दोन वेळा भेट घेतली आहे. या भेटीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षप्रमुखांकडे केली असल्याची माहिती सरकारनामाला सूत्रांनी दिली होती.

A Y Patil and KP Patil
Eknath Shinde News : लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये तुमच्या डोळ्याला टोचतात; ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

लोकसभा निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील यांची भूमिका ही महायुतीच्या बाजूने होती. तर विधानसभा निवडणुकीत के. पी. पाटील यांची भूमिका आघाडीच्या बाजूने आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर आपण महायुतीत गेलो नसल्याचा दाखला त्यांनी माध्यमांसमोर दिला होता. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.

त्यानंतर अबिटकर यांना फाईट देण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून महत्त्वाची ठरेल, अशी चर्चा मतदारसंघात होती. पण महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार सतेज पाटील यांनी समंती दिली तरच उमेदवारी मिळू शकते.

A Y Patil and KP Patil
MVA News : 'मविआ'चे जागावाटप जवळपास फायनल; 22 जागांवरील तिढा कायम असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांने केले स्पष्ट

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत विधानसभेचा शब्द घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देणारे ए. वाय. पाटील यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीला वरिष्ठांच्या सूचनेनुसार थांबलेल्या ए. वाय. पाटील यांनी यावेळी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवायची हा चंग बांधला आहे.

माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी मिळाली तर ए. वाय. पाटील यांची बंडखोरी महाविकास आघाडीतून निश्चित समजली जात होती. ए. वाय. पाटील यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीची मागणी केली आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

मात्र, तत्पूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील आढावा घेतल्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असावा ? याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर मतदारसंघातील उमेदवारी बाबतच्या हालचालींना वेग आला आहे. ए. वाय. पाटील यांचे नाव आता उमेदवार म्हणून समोर येत आहे. त्याबाबतची चर्चा नुकतीच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

A Y Patil and KP Patil
Mahayuti News : उत्तर महाराष्ट्रासाठी महायुतीने आखली रणनीती; 'या' 16 मतदारसंघावर असणार विशेष लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com