Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाला दिले. त्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहावयास मिळाला. निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून शरद पवार गट न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेत निवडणूक आयोगास निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक आयोगाने चिन्हबाबतीत आम्ही जे ऑप्शन दिले होते. ते चिन्ह नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना नवे पर्याय दिले आहेत. त्यासोबतच आता त्यांना उत्तर हायकोर्टातच देऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो, याची संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे. जागावाटपाची चर्चा येत्या काळात लवकरच पूर्ण केली जाईल, अशीही माहिती जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी या वेळी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सोमवारी सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. या सुनावणीत शरद पवार गटाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे. तसेच निवडणुकांपर्यंत राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेऊन एका आठवड्यात नवे चिन्ह देण्याचे आदेश दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार (Ajit Pawar) गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह असल्याचा निकाल नुकताच निवडणूक आयोगानं दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं नोटीस काढली.
या नोटिशीत सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला जे नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवडाभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं या वेळी दिले.
R