Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

NCP News : शरद पवारांच्या आमदाराने घेतली अजितदादांच्या मोठ्या नेत्याची भेट; काय आहे कारण..?

Meeting of two big leaders of NCP : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही पवारांच्यात कलगीतुरा. फलटणमध्ये या भेटीची चर्चा रंगली.
Published on

Satara News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यातच आज शरद पवार यांच्या साताऱ्यातील आमदाराने आज अजितदादा गटाच्या बड्या नेत्याची भेट घेतली. ही भेट राजकीय नसली तरी दोघात बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. त्यामुळे फलटणमध्ये सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील तसेच खासदार श्रीनिवास पाटील हे तीन बडे नेते राहिले, तर अजित पवार यांच्यासोबत माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे दिग्गज नेते गेले. सध्या जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. अनेक प्रमुख पदाधिकारी हे अजित पवार यांच्यासोबत आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar
Riteish Deshmukh : रितेश देशमुखांनी फोडाफोडीच्या राजकारणाचे काढले वाभाडे

दोन्ही राष्ट्रवादीतील जिह्यातील नेत्यात अद्याप कोणताही वाद नाही, पण सध्या भाजप व शिंदे गट शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसची काही प्रमुख मंडळींनी नुकताच भाजप, शिवसेनेत प्रवेश केला आहे. या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी फलटणमध्ये जाऊन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांची भेट घेतली. या भेटीने राष्ट्रवादीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यात दीड - दोन तास बंद दाराआड चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघात काय चर्चा झाली हे समजले नाही, पण याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी रामराजे यांच्याकडे गेलो होतो. माझ्या मुलाचे लग्न येत्या 5 मार्चला पुणे येथील मगरपट्टा येथे आहे. त्याचे निमंत्रण मी दिले आहे, असे त्यांनी सांगितले. पण बंद दाराआड काय चर्चा झाली, हे मात्र दोन्ही नेत्यांनी सांगणे टाळले. फलटणमध्ये सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Ajit Pawar, Sharad Pawar
NCP News : '...त्यावेळीही भाजपला पाठिंबा द्यायचं ठरलं होतं!'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com