Shiv Sena UBT Vs BJP Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Shah Iron Man : अमित शाहांना ‘लोहपुरुष’ म्हणताच शिवसेना ठाकरे पक्षाचा पलटवार; अखिल चित्रेंचा ‘मोहपुरुष’ म्हणत घणाघात

Ameet Satam welcome hoarding calling Amit Shah ‘Iron Man’ sparks a political row in Mumbai : अमित साटम यांच्या स्वागत फलकावरून मुंबईत नवा राजकीय वाद; ‘भारताचे लोहपुरुष एकच, सरदार वल्लभभाई पटेल’ म्हणत चित्रेंचा भाजपवर निशाणा

Pradeep Pendhare

Shiv Sena UBT Vs BJP : महायुतीमधील सत्ताधाऱ्यांमध्ये आपल्या नेत्यांना महापुरूषांच्या उपमा देण्याची स्पर्धा चालू असते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण रंगते. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर होते.

भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांच्या स्वागताचे फलक लावत, त्यावर 'अखंड हिंदुस्थानचे लोहपुरूष', असे लिहिले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी निशाणा साधत, अमित साटम आणि भाजपला डिवचले आहे.

अखिल चित्रे यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत, भाजपचे अमित साटम यांनी मुंबईत (Mumbai) लावलेले स्वागत फलक शेअर केला आहे. याखाली अखिल चित्रे यांनी भारताचे लोहपुरूष एकच, सरदार वल्लभभाई पटेल, असे म्हटले आहे.

अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये, भारताचे लोहपुरुष एकच, सरदार वल्लभभाई पटेल! भाजपाई (BJP) चाटमांना जो लोहपुरुष वाटतो तो खरं तर 'मोहपुरूष' आहे, असा घणाघात केला आहे.

सत्तेच्या मोहापायी देशाला, देशाच्या लोकशाहीला, संविधानाला वेठीस धरणारा मोहपुरूष! असेही अखिल चित्रे यांनी पुढे म्हणत भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. स्वातंत्र्यलढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुम्ही नव्हताच, म्हणून तुम्ही महापुरुष पळवता हे माहित होते. पण आता किमान त्यांना लोकांनी दिलेल्या पदव्या तरी चोरू नका, असा टोला देखील अखिल चित्रे यांनी लगावला आहे.

अखिल चित्रेंच्या टिप्पणीवरून राजकीय वादंग उठणार?

वोट चोर, चंदा चोर, क्रेडिट चोर, आणि आता पदवी चोर, असे म्हणत अखिल चित्रे यांनी भाजप आणि अमित साटम यांना चांगलेच डिवचले आहे. अखिल चित्रे यांच्या पोस्टवर अजून तरी भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु भविष्यात यावरून शिवसेना ठाकरे आणि भाजपमध्ये मुंबईत जोरदार राजकीय कुरघोड्या होण्याचा अंदाज आहे.

खासदार वाघमारेंनी पंतप्रधानांना कुटुंबप्रमुख म्हटलं

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांची नुकताच भेट घेतली. त्यावेळी खासदार वाघमारे यांनी त्यांना कुटुंबप्रमुख असे म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्ते कुटुंबप्रमुख म्हणतात. आता अमित साटम यांनी अमित शाह यांना लोहप्रमुख म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT