Jyoti Waghmare Kutumbpramukh remark : उद्धव ठाकरेंनंतर आता मोदींसाठीही 'कुटुंबप्रमुख' शब्द; ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याची चर्चा

Jyoti Waghmare 'Kutumbpramukh' remark after meeting PM Modi sparks political debate in Maharashtra : राष्ट्रीय हातमाग दिनी पंतप्रधानांना स्वतः विणलेली सोलापुरी चादर भेट; "पंतप्रधान नव्हे, कुटुंबप्रमुखाप्रमाणे संवाद साधला" असे ज्योती वाघमारे यांचे वक्तव्य
Jyoti Waghmare Kutumbpramukh remark
Jyoti Waghmare Kutumbpramukh remarkSarkarnama
Published on
Updated on

Jyoti Waghmare meets PM Narendra Modi : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना हातमाग उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आणि 'स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत' हा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले.

याच दिवशी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन स्वतः विणलेली सोलापुरी हातमागाची चादर त्यांना भेट दिली. भेटीनंतर त्यांनी पंतप्रधानांनी "कुटुंबप्रमुखाप्रमाणे संवाद साधला" असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या, "आज राष्ट्रीय हातमाग दिन असल्यामुळे मी विशेष सोलापुरी हातमागाची चादर विणून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेट दिली. सोलापुरी चादर देशभरात प्रसिद्ध आहे. पंतप्रधानांनी आमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे, कुटुंबातील सदस्यांशी जसा संवाद साधला जातो, तसा संवाद साधला. त्यांनी आम्हाला अतिशय मोलाचा सल्ला दिला. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा आहे."

'कुटुंबप्रमुख' शब्दावरून राजकीय चर्चा

ज्योती वाघमारे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते आणि नेते 'कुटुंबप्रमुख' म्हणून संबोधत असत. आता शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही 'कुटुंबप्रमुख' हा उल्लेख केल्याने या शब्दाच्या राजकीय वापराबाबत पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jyoti Waghmare Kutumbpramukh remark
Wedding Rules : विवाह सोहळ्यांसाठी नवी आचारसंहिता; रात्री 10 नंतर DJ बंद, 11.30 पर्यंत लॉन्स रिकामे करणे बंधनकारक

हातमाग दिनानिमित्त मोदींचे आवाहन

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक विशेष व्हिडिओ शेअर करत स्वदेशी आंदोलनाची आठवण करून दिली. त्यांनी 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनाचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी त्याची सांगड घातली.

Jyoti Waghmare Kutumbpramukh remark
Ajit Pawar NCP Thane : राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! वीरू वाघमारे-हेमंत वाणींसह शेकडो कार्यकर्त्यांची शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी

विणकर बांधवांच्या कष्टांचा सन्मान

मोदी म्हणाले, "7 ऑगस्ट 1905 हा दिवस भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली. त्यातूनच आत्मनिर्भर भारताची पायाभरणी झाली. राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्याचा अर्थ म्हणजे आपल्या विणकर बांधवांच्या कष्टांचा सन्मान करणे. प्रत्येक नागरिकाने या निमित्ताने किमान एक हातमाग उत्पादन खरेदी करून विणकर कुटुंबांना बळ द्यावे." हातमाग उद्योगाला चालना देण्यासोबतच स्थानिक उत्पादनांचा स्वीकार वाढविण्याचे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com