Mangal Prabhat Lodha |Radhakrishna Vikhe Patil | Medha Kulkarni Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : लोढांकडे बारामती, विखेंकडे नांदेड, कुलकर्णींकडे नगर; भाजप नेमकं काय शोधतंय?

BJP Appointment Observers Defeats Lok Sabha Constituency : महायुतीतील भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभव झालेल्या जागांची देखील भाजपकडून तपासणी होणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला. महायुतीला ज्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. त्या ठिकाणची कारणं भाजप शोधत आहे. यासाठी भाजपने पक्ष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, अहमदनगरसाठी खासदार मेधा कुलकर्णी तर, बारामतीमध्ये कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून जो अहवाल सादर होईल, त्याचा उपयोग विधानसभा निवडणुकीला भाजपला होणार आहे.

नांदेड मतदारसंघाची जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर देण्यात आली आहे. विखे आणि चव्हाण परिवाराचे एकमेकांशी असलेल्या राजकीय मित्रत्वाचे संबंध सर्वश्रुत आहे. विखे नांदेड मतदारसंघाचा अहवाल काय सादर करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

बारामती मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. या मतदारसंघात नंदन-भावजय यांच्यात लढत झाली. सुप्रिया सुळे या मतदारसंघातून झाल्या. या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहवाल सादर होणार आहे.

महायुतीतील शिवसेना Shivsena एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभव झालेल्या जागांची देखील भाजपकडून तपासणी होणार आहे. चंद्रपूर मतदारसंघाचा अहवाल आमदार श्रीकांत भारतीय, रामटेक खासदार अनिल बोंडे यांना निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

दिंडोरीची जबाबदारी विजया रहाटकरांकडे

अमरावती अशिष देशमुख, वर्धा आमदार प्रवीण दटके, भंडारा-गोंदिया रणजीत पाटील, यवतमाळ-वाशिम आमदार आकाश फुंडकर, दिंडोरी विजया रहाटकर, हिंगोली आमदार संजय कुटे, उत्तर-पश्चिम मुंबई सुनील कर्जतकर, दक्षिण मुंबई माधवी नाईक, उत्तर-मध्य मुंबई हर्षवर्धन पाटील, उत्तर-पूर्व मुंबई आमदार राणा जगजितसिंह, मावळ आमदार प्रवीण दरेकर, अहमदनगर खासदार मेधा कुलकर्णी, माढा आमदार अमित साटम, भिवंडी गोपाळ शेट्टी असे निरीक्षक नेमण्यात आली आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT