Shishupal Patle sarkarnama
महाराष्ट्र

Congress Vs BJP : भाजपला मोठा झटका! बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Shishupal Patle Congress BJP Praful Patel : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून डॅमेट कंट्रोल सुरू करण्यात आले होते. मात्र, भंडारा-गोंदियातील शिशुपाल पटले हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Roshan More

Congress Vs BJP : विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा झटका लागला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करणारे, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत.

मुंबईत 16 ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. त्याआधी पटले काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 जुलैला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचा पराभव शिशुपाल पटले यांनी केला होता. पटले हे भंडारा गोंदियातील भाजपच्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक होते. मात्र, राजीनामा देत त्यांनी पक्षात लोकशाही राहिली नसल्याची टीका केली होती.

काँग्रेसची ताकद वाढणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 10 पैकी 7 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपकडून डॅमेट कंट्रोल सुरू करण्यात आले होते. मात्र, भंडारा-गोंदियातील शिशुपाल पटले हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिशुपाल पटले यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने काँग्रेसची ताकद अजून वाढेल.

भाजपवर टीका

भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही. जुन्या कार्यकर्त्यांना काही किंमत राहिली नाही. सामन्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. खऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडला आहे, अशी टीका पटले यांनी भाजपच्य सदस्यत्वाचा राजीनामा देताना केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT