Pune Assembly Elections Congress: 8 विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडे 24 अर्ज: सर्वाधिक इच्छुक 'या' मतदारसंघात

Pune 8 Assembly Elections 24 applications to congress: काँग्रेसने देखील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या जागा आपल्यालाच मिळतील असं जवळपास निश्चित मानले आहे.त्या व्यतिरिक्त एखाद दोन जागा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली आहे.

काँग्रेसकडून (congress) देखील महाराष्ट्रातील 288 जागांवर पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांना अर्ज करण्यास सांगितले होते. पुण्यातील (pune) आठ विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांना पाच ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार नियोजित वेळात तब्बल 24 इच्छुकांचे अर्ज काँग्रेसला प्राप्त झालेला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित सामोरे जाणार असल्याचं वारंवार आघाडीतील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सांगत आहेत. मात्र असं असलं तरी काँग्रेसने राज्यातील 288 जागांवर निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या महत्त्वकांक्षा बळवल्या आहेत. जागा वाटपामध्ये अपेक्षित अशा जागा काँग्रेसला न सुटल्यास आणि ऐनवेळी 'एकला चलो' ची भूमिका घ्यावी लागल्यास सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आपली तयारी असावी या दृष्टिकोनातून सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

Pune Congress
NCP Politics: राष्ट्रवादी दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली; आमदारकीचे डोहाळे? वडिलांच्या नावावर राजकारणात...

पुणे शहरातील आठ विधानसभा जागां पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सहा जागांवर दावा सांगितला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने देखील सहा जागांवर महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. काँग्रेसने देखील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या जागा आपल्यालाच मिळतील असं जवळपास निश्चित मानले आहे.त्या व्यतिरिक्त एखाद दोन जागा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे.

लोकसभा निवडणुकी वेळी देखील काँग्रेसकडून अशाच प्रकारे इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 20 इच्छुकांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. याच अर्जातून रवींद्र धंगेकर यांची निवड करून काँग्रेसने उमेदवारी घोषित केली होती.

आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कसबा, शिवाजीनगर ,हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, वडगाव शेरी आणि कोथरूड या आठ मतदारसंघांमधून तब्बल 24 इच्छुकांच्या अर्ज काँग्रेसला प्राप्त झाले आहेत. यातूनच तीन किंवा चार काँग्रेस उमेदवार निवडले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला असला तरी शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक चित्र दिसलं. कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे पुण्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केलेल्या 24 जणांना मधील बहुतांश जणांनी या तीन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अर्जासाठी देखील होऊ द्या खर्च

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा लोकसभेच्या एक जागेसाठी तब्बल 20 अर्ज करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसने अर्ज करणाऱ्यांकडून कोणतीही रक्कम घेतली नव्हती.

मात्र विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे जे अर्ज मागविण्यात आले आहे. त्या अर्जाबरोबर शुल्क देखील आकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गासाठी वीस हजार तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी दहा हजारांची रक्कम घेण्यात आली आहे.त्यामुळेच लोकसभेत वेळी आलेल्या अर्जांच्या तुलनेत यावेळी अर्जांची संख्या जागेच्या नुसार कमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com