Gopichand Padalkar On Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Gopichand Padalkar On Sharad Pawar Bharat Ratna demand : शरद पवारांना भारतरत्न द्या, खासदार लंकेंची मागणी; पडळकर म्हणाले, 'काय मंडळाचा..!'

BJP Gopichand Padalkar Reacts to Demand for Bharat Ratna for Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भारतरत्न देण्याची खासदार नीलेश लंके यांच्या मागणीवर गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला.

Pradeep Pendhare

Bharat Ratna controversy : शरद पवार म्हणजे, राजकारणातील तेल लावलेला पैलवान! कोणत्याही राजकीय डावपेचात, ते कधीही कुणाच्याही हाती न लागलेला पैलवान, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शरद पवार यांच्या राजकीय कारकि‍र्दीची स्तुती करतात. शरद पवार यांनी नुकताच 85 वा वाढदिवस साजरा केला.

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी नीलेश लंके यांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. परंतु खासदार लंकेंच्या या मागणीवर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोचक टोला लगावला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांचे वेगवेगळ्या पक्षातील हितचिंतक भाजपविरुद्ध आणि पडळकरांविरोधात आक्रमक होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्ली इथं वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला डिनर डिप्लोमेसी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्योगपती गौतम अदाणी, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. खारदार नीलेश लंके यांनी यातच शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली.

खासदार लंके यांच्या या मागणीवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर आणि वकील गोपीचंद पडळकर यांनी खासदार लंके यांच्या या मागणीची जोरदार खिल्ली उडवली आहे.

कर्जमाफीसह अनेक निर्णयांमध्ये पवारांचा मोठा वाटा

संसदेची हिवाळी अधिवेशन सुरू आहे, असे सांगत खासदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांना भारतरत्न दिले जावे, अशी मागणी करणार आहोत. शरद पवार, असे एकमेव कृषिमंत्री आहेत, ज्यांच्या काळात 72 हजार कोटींची विक्रमी, अशी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे, असे म्हटले.

मंडळाचा पुरस्कार आहे का?

खासदार लंके यांच्या या मागणीवर गोपीचंद पडळकर यांना नागपूर विधिमंडळात माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी खिल्ली उडवणारी प्रतिक्रिया दिली. पडळकर म्हणाले, "अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन आटोपल्यानंतर मी आता शांतपणे गावाला जातो. भारतरत्न हा कुठल्या मंडळाचा पुरस्कार आहे का? काहीही मागणी केली जाते."

लंके अन् पडळकरांमध्ये जुंपणार?

दरम्यान, खासदार लंके अन् गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय विचारावर कधीच जुळले नाही. पडळकर यांनी यापूर्वी देखील पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यावरून लंकेंनी पडळकरांना चांगलेच सुनावलं होतं. "आपली उंची काय? आपण कुणाबद्दल बोलतात. शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला मिळालेला परिस आहे. आमच्यावर पक्षाने चांगले संस्कार केले आहेत, अन्यथा पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही", असा थेट इशारा नीलेश लंकेंनी पडळकरांना दिला आहे. आता पुन्हा खासदार लंकेंच्या मागणीवर पवारांना डिवचणारी पडळकरांनी प्रतिक्रिया दिल्याने, त्यावर लंके कोणत्यापद्धतीने प्रत्युत्तर देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT