

Maharashtra Talathi Union : नवा लॅपटॉप आणि प्रिंटर मिळण्यासाठी वारंवार विनंती करूनही सरकारकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यातील 15 हजार तलाठ्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
येत्या सोमवारपासून (ता. 15) हे सर्व तलाठी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार असून ई-पीक पाहणी, डिजिटल सातबारा, ई-फेरफारसह सर्व संगणकीय प्रक्रिया रखडणार असल्याचं चित्र आहे.
गावपातळीवरील महसुली कामकाजाची प्रमुख जबाबदारी तलाठ्यांवर असते. वेगवेगळी महसुली काम करताना, तलाठ्यांवर (Talathi) कामाचा प्रचंड ताण आहे. सातबारा नोंदणी, फेरफार, डिजिटल सातबारा, ई-पीक पाहणी, नुकसानीचे पंचनामे, विविध योजनांची अंमलबजावणी, अशा अनेक आघाड्यांवर तलाठी एकाचवेळी काम करतोत.
वेगवान अन् गतिमान काम करण्यासाठी सरकारने (Government) तलाठ्यांना देखील स्मार्ट केलं आहे. इंटरनेट, लॅपटाॅपसह विविध स्मार्ट उपकरणांशी जोडून तलाठी कार्यालय अद्ययावत केलीत. तलाठ्यांच्या हातातील जीर्णावस्थेतील, पारंपरिक साधने काढून, घेत स्मार्ट उपकरणं देण्यात आली आहेत. परंतु 8 ते 10 वर्षांपूर्वीचे लॅपटॉप, वारंवार सर्व्हर न मिळणे, प्रिंटरअभावी प्रतींचे वितरण न होणे अशा अडचणींमुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. हीच उपकरणं अद्ययावत करून मिळावीत, यासाठी आता तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे.
तलाठी संघाच्या निवेदनात नवीन लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध होईपर्यंत ऑनलाईन कामबंदीचा इशारा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला आहे. परिणामी गावापासून शहरापर्यंतचे महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
गतिमान आणि पारदर्शी कारभाराच्या उद्देशाने सरकारने तलाठ्यांना लॅपटॉप-प्रिंटर दिले होते. त्यावेळी दर पाच वर्षांनी जुने उपकरण बदलून नवीन देण्याचा आदेशही सरकारने काढला होता; परंतु या आदेशाची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. आंदोलनाची चाहूल लागताच सरकारने पातळीवर नवीन लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्याचे समजते.
महाराष्ट्र तलाठी संघाचे राज्याध्यक्ष नीळकंठ उगले यांनी म्हटले आहे की, तलाठ्यांकडील लॅपटॉप व प्रिंटर जुने झाल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी भरती झालेल्या 3200 तलाठ्यांना अद्याप लॅपटॉप मिळाले नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.