Amit Shah  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? कधी ठरणार? अमित शाह यांनी टायमिंग सांगितलं

BJP leader Amit Shah : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकल्यास महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर दिल्लीत भाजपच्या हायकमांडमध्ये खलबतं सुरू असून, सर्व सूत्र भाजप नेते अमित शाह यांच्या ताब्यात आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी भिडत असताना, तिसरी आघाडी, मनसे यांच्यासह इतर राजकीय संघटना एकमेकांविरुद्ध नशीब आजमावत आहेत.

यात मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, कोणाला लाॅटरी लागेल, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केला नसताना, महायुतीच्या गोठ्यातून मुख्यमंत्रिपदाबाबत माहिती समोर आली आहे.

महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेतला जाणार आहे. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असेल, असे सूत्र ठरल्याचे सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत आहे. दिल्लीत ते तळ ठोकून बसले आहे. महायुतीच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. अमित शाह यांच्या घरी ही बैठक झाली. अजित पवार देखील बैठकीला उपस्थित होते.

या महायुतीच्या जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. तसंच मुख्यमंत्रिपदावर देखील चर्चा झाली. या बैठकीत आमदारांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपद ठरवलं जाईल, असे अमित शाहांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीला अजित पवार यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील बैठक उरकून गुवाहाटीला जाणार आहेत. तिथं कामाख्या देवीचं दर्शन घेण्याची शक्यता आहे. निवडणुकीपर्वी एकनाथ शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. आमदारांना बरोबर घेऊन बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT