Mumbai News : देशाचं आर्थिक केंद्र आणि महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेल्या मुंबईवर महायुतीचा सर्वाधिक डोळा आहे. इथं सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी महायुती भाजप वेगवेगळे राजकीय डाव खेळत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत मुंबईत जोरदार फिल्डिंग लावलीय. कोणतीही 'रिक्स' न घेता, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपला मैदान मोकळं ठेवलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन चार-पाच दिवस झाले असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. आता तर तिढा वाढला आहे. त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा, अन् उमेदवार कोण, याची उत्सुकता वाढली आहे. देशाचं आर्थिक केंद्र असलेलं आणि महाराष्ट्राच सत्ता केंद्र असलेल्या मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शह देण्यासाठी महायुतीनं कंबर कसलं आहे.
महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना (ShivSena) मुंबईत 15 जागांवर निवडणूक लढणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 17 मतदार संघात निरीक्षक नेमले होते. या निरीक्षकांकडून उमेदवारांची चाचपणी करून घेत, त्याचा अहवाल मागवला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रोखण्यासाठी महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईच्या मैदानात उतरवलं आहे.
मुंबईतील 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली. तर उर्वरित जागा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईत महायुतीमधील संभाव्य भाजप 17 किंवा 18, शिवसेना 15 आणि एनसीपी अजित पवार गट 3 किंवा 4 जागा, असा असेल, असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.