Chandrashekhar Bawankule Sanjay Raut  sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News : 'संजय राऊत हिंमत असेल तर...', चंद्रशेखर बावनकुळे चिडले

Sanjay Raut News : राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Roshan More

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यासाठी भाजपने प्रत्येक जागेवर नियोजन केले. नागपूरची नितीन गडकरींची जागा भाजप एकतर्फी जिंकेल, असा दावा भाजप करत होते. मात्र, गडकरी यांना पराभूत करण्याचा प्रयत्न मोदी-शाह-फडणवीस यांनी एकत्रितपणे केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी आपल्या 'रोखठोक' या 'सामना'तील लेखात केला. राऊतांच्या या दाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

'उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?', असा टोला बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी आपल्या ट्विटरवरून लगावला आहे.

राऊतांसाठी शरद पवार प्रथम

'मोदीजी Narendra Modi, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार.' या शब्दांत बावनकुळे यांनी संजय राऊतांच्या दाव्याला चोख प्रत्युत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंमत असेल तर...

2019 मध्ये शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.या सरकारमध्ये संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. 2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या, असे आवाहनच बावनुकळे यांनी संजय राऊतांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT