Mumbai News, 26 May : दिनांक 4 जुलै. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री तर सोबत गेलेल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावही अजित पवार यांना मिळालं आहे. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाला गळती लागली आहे. शनिवारी ( ता. 25 ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. यातच आता आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय युवती आघाडीच्या अध्यक्ष सोनिया दुहान ( Soniya Duhan ) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. धीरज शर्मा ( Dheeraj Sharma ) यांच्यासोबत सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार यांच्या पक्षात जाण्याबाबत सोनिया दुहान यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. काही तासांपूर्वी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सोनिया दुहान यांनी 'इंडिया' आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.
सोनिया दुहान कोण आहेत?
राष्ट्रवादीचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सोनिया दुहान करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केलं आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोनिया दुहान यांनी पक्षप्रवेश करत सक्रिय कामास सुरूवात केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळचा शपथविधी घेतला. तेव्हा, सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी सोनिया दुहान चर्चेत आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.