मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला गेला.
या प्रकरणी नितेश राणे यांनी उडी घेत कठोर इशारा दिला आणि मराठा परंपरेचा दाखला दिला.
या वादानंतर आता मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. ही मराठा समाजाच्या आरक्षणाची 'शेवटची' लढाई असल्याचे सांगत त्यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. तर 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणार आहे. याआधी जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके जरांगेवर तुटून पडले आहेत. ते जरांगेवर आरोप करताना दिसत असतानाच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. त्यांनी, रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करताना जोरदार टीका केली आहे. तसेच 'जो फडणवीसांच्या आईविषयी वादग्रस्त वक्तव्य करेल त्याची जीभ हातात काढून देऊ', असा इशाराच राणेंनी दिला आहे.
राणेंनी, 'जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कोणाच्याही आई-बहिणींचा अनादर केला नाही. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई जरूर लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. माझ्या सारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराच राणेंनी यावेळी दिला आहे.
जरांगे पाटील नेमकं म्हणाले?
जरांगे पाटील यांनी, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेतो असे म्हटलं आहे. आता फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, असेही मागणी जरांगे पाटील यांनी केली होती.
तर त्यावेळी त्यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख करताना, पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले. तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशीच आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे, तुझ्या आईची मी पूजा करतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली होती. तसेच ज्या पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले, त्यांना सस्पेंड न करता, मोठी पदे दिल्याचा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला होता.
त्यानंतर ता भाजपकडून जरांगे-पाटील यांना लक्ष केलं जात असून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील टीका केली होती. त्यानंतर आता नितेश राणे यांनी देखील थेट जीभ हातात देण्याचा इशारा दिला आहे. यावर आता जरांगे पाटील कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.
प्रश्न 1: वादाची सुरुवात कशामुळे झाली?
उत्तर: बीड येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप झाला.
प्रश्न 2: नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: राणे यांनी जरांगे पाटलांना इशारा देत म्हटलं की "मराठे आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत" आणि कठोर शब्दांत विरोध दर्शवला.
प्रश्न 3: पुढील घडामोडी काय अपेक्षित आहेत?
उत्तर: मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर आणि भाजपकडून आणखी कडक भूमिका हेच पुढील टप्प्यात महत्त्वाचे असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.