Nitesh Rane: 'वराह भगवान' जयंती राज्यभरात साजरी व्हावी! शाळांमध्ये व्याख्यानं आयोजित करा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nitesh Rane: या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी चार गोष्टींचा विचार व्हावा अशी मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane
Published on
Updated on

Nitesh Rane: राज्यात वराह जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जावी यासाठी मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. वराह देवाचं हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे, येत्या २५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. राज्यभर हा जयंती उत्सव अधिकृतरित्या साजरा व्हावा असं राणेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यासाठी चार गोष्टींचा विचार व्हावा अशी मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे.

Nitesh Rane
Parliament Session : केवळ विरोधकच नव्हे तर नितीश कुमार, चंद्राबाबूंवरही अंकुश ठेवण्याचा प्लॅन? केजरीवाल ठरले कारणीभूत...

पत्रात काय म्हटलं?

नितेश राणे पत्रकात म्हणतात, "हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार मानला जातो. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक व रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे. २५ ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून, या दिनाचं धार्मिक तसंच सांस्कृतीक महत्व अपार आहे. वराह भगवानाच्या पूजनानं वसुंधरा, समाजात धर्म, सदाचार व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. हिंदू समाजात या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून, राज्यभर ही जयंती अधिकतरित्या साजरी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसंच मंदिरांमध्ये पूजा-अर्चा आयोजित केली जावी, यासाठी योग्य ती अधिसूचना देण्यात यावी"

Nitesh Rane
'बेस्ट' पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू अन् महायुतीला वरचढ ठरलेले शशांक राव कोण?

'या' चार बाबींचा विचार व्हावा

नितेश राणे या पत्रात पुढे लिहितात की, वराह जयंती साजरी करण्याबाबत पुढील चार बाबींचा विचार व्हावा.

  1. २५ ऑगस्ट भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा.

  2. शासनामार्फत जिल्हा पातळीवर व प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.

  3. शाळा व महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्यानं आयोजित करावीत.

  4. मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा व भक्तीचं आयोजन करण्यात यावं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com