BJP Politics : मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेना निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडावा लागला. त्यानंतर गृह खात्याचा आग्रह शिंदेंनी केला मात्र ते खाते देखील त्यांना मिळाले नाही. आता पालकमंत्रिपदाबाबत देखील एकनाथ शिंदेंची इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर एकनाथ शिंदेंनी दावा केला होता.
नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन तर रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही जागांवरील पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने शिंदेंची इच्छा पूर्ण होणार अशा चर्चा होत्या. मात्र, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का देत नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेनेस देण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये तीन वर्षानंतर सिंहस्थकुंभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडे राहणार असल्याचे एकनाथ शिंदेंना स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत देखील हस्तक्षेप करण्यास भाजपश्रेष्ठींनी नकार देत हा प्रश्न एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत.
गिरीश महाजन यांना पत्रकारांनी पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, पालकमंत्रिपदाबाबत मला अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पालकमंत्रिपदाबाबत काही माहिती असेल तर ते मुख्यमंत्रीच सांगतील. तिच माहिती अधिकृत समजली जाईल.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्रीपदाबाबत माझा हट्टा नाही. कुंभमेळ्याबाबत एक दीड वर्षापूर्वीच गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. त्याबाबत आम्ही त्यांना सहकार्य करू असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा लवकरच सुटेल. महायुतीमध्ये सर्वकाही सुरळीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.