
crime against women Pune : पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड वर झालेल्या बलात्काराने सबंध महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. आरोपी दत्तात्रेय गाडे हा बलात्कारापूर्वी इन शर्ट, उंची कपडे घालून विविध बस स्टँडवर फिरताना पाहायला मिळाल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे. त्यामुळे त्याने या प्रकारच्या आणखी काही गुन्हे केलेत का ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. त्याच्या या गुन्हेगारीपद्धती बाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली आहे.
गृहमंत्री योगेश कदम(Yogesh Kadam) यांनी आज पुण्यात घटनास्थळाला भेट दिली. तसेच पोलिसांकडून या घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. योगेश कदम म्हणाले, गुन्हेगार ताब्यात आल्यानंतर माहिती समोर येईल मात्र तू विकृत मानसिकतेचा तरुण त्या तरुणीशी दोन-तीन मिनिटे गोड बोलतो, तिचं ब्रेन वॉश करतो. त्यानंतर जी काही घटना घडली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र अशावेळी त्या ठिकाणी कोणतीही हाणामारी, कोणताही वाद, कोणतीही जोरजबरदस्ती घडलेली नाही. जे काही घडलं ते अतिशय शांततेत घडवून आणले आहे.
त्या ठिकाणी कोणती आरडाओरड, मारहाण झालेली नाही. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील काही समजू शकलं नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ज्या वेळेस आरोपी ताब्यात येईल त्यावेळेस सर्व सत्य समोर येईल, असं कदम म्हणाले.
घटना पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्यानंतर साधारण नऊ वाजेच्या दरम्यान फिर्याद आली त्यानंतर आरोपीला आयडेंटिफाय करून त्याला ट्रॅक करण्यात आला आहे. तसेच तो कोणत्या बस मधून गेला आणि तो कोणत्या लोकेशनला असू शकतो याबाबत पोलिसांकडे माहिती आहे. त्यामुळे पुढील काही तासात हा आरोपी आपल्या ताब्यात असेल. असा विश्वास राज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केला.
पोलीस तपासामध्ये हा आरोपी मागील काही दिवस विविध बस स्टँडवर फिरताना दिसून आला आहे. त्याचं राहणीमान अतिशय चांगल असून शर्ट इन केलेला आणि व्यवस्थित कपडे घातलेला तो व्यक्ती आहे. त्यामुळे तो आरोपी गुन्हेगार असेल असं चटकन ओळखणं अवघड आहे. ही त्याची मोडस ऑपरेंडी असेल मात्र याबाबत आरोपी सापडल्यानंतर अधिकची माहिती मिळेल असं कदम म्हणाले
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
*२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप*
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.