BJP Vs Mahavikas Aaghadi : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपचा डंका वाजला आहे. शुक्रवार (21 नोव्हेंबर) अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत भाजपचे जवळपास 100 नगरसेवक आणि 6 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. यात दौंडाईचा नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायत इथल्या नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. याशिवाय काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
पण भाजप आणि महायुतीच्या या झंझावातात अलिबागमध्ये महाविकास आघाडीचाही एक शिलेदार बिनविरोध झाला आहे. हा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाही, तर शेतकरी कामगार पक्षाचा आहे. अलिबाग नगरपरिषदेमध्ये प्रभाग क्रमांक २ ब मधून 'शेकाप'चे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. नाईक यांच्याविरोधातील भाजपच्या संतोष साळुंखे यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर नाईक यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
बिनविरोधची संख्या वाढणार?
बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये शुक्रवार (21 नोव्हेंबर) हा अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरचा दिवस होता. पण जिथे न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे अशा ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे अनेक जागा बिनविरोध येणार असल्याचा दावा त्या त्या ठिकाणच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यानंतर 3 डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दौंडाईचा आणि अनगर चर्चेत :
धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजप मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात दौंडाईचा ही नगरपालिका बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल निवडून आल्या. तर माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील यांनी तर राष्ट्रवादीकडून उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. पण थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने ही निवडणूकही बिनविरोध ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.