BJP Latest News Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; पाच जागांसाठी मागितली 35 जणांनी उमेदवारी

MVA Vs Mahayuti Politics News: महायुतीकडे 200 पेक्षा अधिक आमदार असल्याने 9 जागा निवडून येईल एवढे संख्याबळ महायुतीकडे आहे. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येतील, असे चित्र आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आमदारातून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या जागेवरून महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

महायुतीकडे 200 पेक्षा अधिक आमदार असल्याने 9 जागा निवडून येईल एवढे संख्याबळ महायुतीकडे आहे. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येतील, असे चित्र आहे. भाजपच्या (BJP) वाटायला येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजप प्रदेश कार्यालयाकडे मागितली आहे. (Bjp News)

विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी महायुतीकडे 9 जागा निवडून येईल एवढे संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला पाच जागा येतील तर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा येतील अशी परिस्थीती आहे. तर दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार असून त्यापैकी एक जागा काँग्रेसला मिळणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराच्या मदतीने शेकापचे जयंत पाटील पुन्हा निवडून येतील एवढे संख्याबळ आहे.

महायुतीमध्ये सर्वाधिक पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजप प्रदेश कार्यालयाकडे आतापर्यंत 35 जणांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. या 5 जागांसाठी भाजपकडे आतापर्यंत 35 इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जावर पुन्हा एकदा कोअर कमिटी बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर कोअर कमिटी बैठकीत चर्चा झाल्यानंतर ही उमेदवाराची यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे. त्यामुळे या पाच नावाची घोषणा दिल्लीतून केली जाणार आहे.

भाजपकडून उमेदवारी देताना भौगोलिक, सामाजिक समिकरण निकषावरच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांची भाजप प्रदेशकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या 35 उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यापैकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT