Solapur BJP Meeting : सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ; निरीक्षक धनंजय महाडिकांनाच विचारला कार्यकर्त्यांनी जाब!

MP Dhananjay Mahadik : सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहोळच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता.
Solapur BJP Meeting
Solapur BJP MeetingSarkarnama

Solapur, 22 June : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या चिंतन बैठकीसाठी निरीक्षक म्हणून खासदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) आले होते. या चिंतन बैठकीतच भाजप पदाधिकाऱ्यांनी महाडिकांना जाब विचारला, त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) भाजप (BJP) उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आज सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बैठकीत गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहोळच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच, प्रणिती शिंदे यांच्यासाठी मेळावाही घेतला होता. मोहोळमधून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे भीमा कारखान्याच्या काही संचालकांनी शिंदेंना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर भीमा कारखान्याचे प्रमुख तथा भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखालीच पराभवाची चिंतन बैठक आयोजित केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्या नाराजीचा भडका चिंतन बैठकीत उडाला.

Solapur BJP Meeting
Bidri Sugar Factory : महाआघाडीच्या वाटेवर असलेल्या के. पी. पाटलांच्या बिद्री कारखान्यावर छापा

भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक बोलायला उभे राहिले, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा मुद्दा मांडला. कारखान्याची काही संचालकांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा का दिला, असा सवाल महाडिकांना विचारला. मात्र, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली.

दरम्यान, सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ घातल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले. गोंधळानंतर भाजपची बंद दाराआड बैठक सुरू आहे.

Solapur BJP Meeting
Udayanraje On Reservation : जातनिहाय जनगणना करा अन ज्याचा त्याचा वाटा देऊन टाका; आरक्षणावर उदयनराजेंची रोखठोक भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com