Pune News : समाजातील अंधश्रद्धा आणि गुलामगिरीला लाथ मारुन क्रांतीचा लढा देणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची शुक्रवारी (ता.11) 198 वी जयंती आहे. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला असतानाच दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उदयनराजेंना त्यांच्या वक्तव्यावरुन लक्ष्य केलं आहे.
ओबीसी नेते आणि आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शुक्रवारी (ता.11) साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले,आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना त्याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले असं कसं बेजबाबदारपणे वागू शकतात? अशी संतप्त विचारणाही यावेळी हाके यांनी केला.
हाके म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचं आणि छत्रपती या शब्दाचं एक वेगळं नातं आहे. मात्र, कुठलाही अभ्यास न करता, इतिहासकार यांचा सल्ला न घेता एका खासदारानं अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य एका खासदारानं करता कामा नये असंही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके यांनी यावेळी उदयनराजे भोसलेंच्या रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी काढून फेकून द्या,या भूमिकेवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का? मुख्यमंत्र्यांचे अधिकार तुमच्याकडे आहेत का? तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे काही आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच उदयनराजेंचे आजचे वक्तव्य म्हणजे या महाराष्ट्राच्या समाज मनाचा अपमान आहे, त्यामुळे उदयनराजेंनी खासदारकीच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केली पाहिजे असा सल्लाही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली, असं आजपर्यंत इतिहासाचा दाखला देत इतिहासकारांसह सर्वच दावा करतात.विधवा पुनर्विवाह,स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारण अशी समाजसुधारक म्हणून भूमिका निभावली होती.तसेच अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठीही त्यांनी कठोर पावले उचलली जात आहेत.
पण याचवेळी आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जाणारे भाजप खासदार उदयनराजे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी मोठं विधान करत नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केल्याचा दावाही उदयनराजेंनी यावेळी केला.
तसेच प्रतापसिंह महाराज यांनी आपल्याच राजवाड्यामध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील तिथंच झालं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.