Mumbai News, 11 Apr : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलं आहे. मात्र, राणाला भारतात आणल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा खळबळजनक दावा करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजप सगळे निर्णय मुहूर्त बघून घेतं. त्यामुळे बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फाशी देतील आणि देशात 'राणा फेस्टिवल' घेतील, असं म्हणत राऊतांनी भाजपला डिवचलं आहे.
तसंच मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. राऊत म्हणाले, "आधीही अबू सालेमलाही कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात आणलं होतं तसंच राणाचं आहे.
मात्र, या प्रकरणाचा फेस्टिवल करू नका आणि भाजपाला जर राणाचं क्रेडिटच घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचंही क्रेडिट घ्यावं. तसं भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधव यांनाही परत आणावं."
दरम्यान, राऊतांनी यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात अबू सालेमला भारतात आणल्याच्या घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, तहव्वूर राणाला भारतात आणलं म्हणून क्रेडिट घेणाऱ्या भाजपवाल्यांना या आधीही अनेकांना भारतात आणलंय हे माहिती पाहिजे. याआधी अबू सालेमला भारतात आणलं आहे. शिवाय राणाला भारतात आणण्यासाठी 2009 पासून भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
2009 साली राणा आणि हेडली विरोधात एनआयएने पहिला गुन्हा दाखल केला. तर 2012 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद अमेरिकेला गेले आणि राणाला भारतात आणण्याबाबतची चर्चा केली. कुणालाही भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे हे आपल्या भारत सरकारचं यश आहे. त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असंही राऊत म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.