BJP MP Ujjwal Nikam Sarkarnama
महाराष्ट्र

BJP MP Ujjwal Nikam legal notice : उज्ज्वल निकमांची नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत लीगल नोटीस

BJP MP Ujjwal Nikam Served Legal Notice by Asim Sarode for Rajya Sabha Membership Cancellation : उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकीलपदाची आणि राज्यसभा सदस्यत्वाची एकाच वेळी नियुक्तीबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Legal notice to Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकीलपदाची आणि राज्यसभा सदस्यत्वाची एकाच वेळी नियुक्तीबाबत तातडीने घटनात्मक स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी करणारी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

पक्षकार संघ या संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रेया आवले, अ‍ॅड. रोहित टिळेकर यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कायदा आणि न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार, मंत्रालय, सचिव राज्यसभा दिल्ली यांना मनीष देशपांडे यांच्यातर्फे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे, सरकारस्तरावर याबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सुमारे 29 महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) काम करू शकतात का? विशेष सरकारी वकील म्हणून काम करत राहिल्यास उज्ज्वल निकम यांना भारतीय संविधानाच्या कलम 102 अंतर्गत अपात्र ठरवता येईल का? असे प्रश्न सुद्धा या नोटिसीमधून संबंधित विभागाला विचारण्यात आले आहेत.

उज्ज्वल निकम यांचा राजीनामा मागण्यासाठी किंवा विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती रद्दसाठी आणि ती तात्काळ घोषित करण्यासाठी, महाधिवक्ता यांच्याकडून या विषयावर कायदेशीर मत मागावे, घटनात्मक पारदर्शकता आणि सार्वजनिक विश्वास राखण्यासाठी, या विषयावर सार्वजनिक स्पष्टीकरण किंवा कायदेशीर मत जारी करावे. तसेच नियुक्ती अधिकारी म्हणून विधी आणि न्याय मंत्रालय, राज्यसभेचे सचिव आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) महाधिवक्ता यांनी उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून काम करायचे आहे की नाही, याबद्दल लेखी स्पष्टीकरण मागवावे, असे नोटीसद्वारे म्हटले आहे.

या नोटीसचे सात दिवसात उत्तर द्यावे अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान, आमच्या समजुतीनुसार, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून, उज्ज्वल निकम भारतीय संविधानाच्या कलम 102(1) आणि कलम 191(1) नुसार केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत लाभाचे पद धारण करू शकत नाहीत. सरकार आणि सरकारकडून असंविधानिक कृत्य होत आहे, असे मनीष देशपांडे यांनी म्हटले.

कुणी खासदार झाल्यावरही विशेष सरकारी वकील म्हणून काम करता येईल, असा कायद्यात बदल करण्यात आला असेल आणि निकम साहेब जर या केसेससाठी सरकारकडून शुल्क घेत नसतील तर, उज्ज्वल निकम खासदार असूनही सगळ्या केसेस चालवू शकतात का? महाराष्ट्रात असे जवळपास 25 ते 29 महत्त्वाचे खटले आहेत जिथे पीडित आणि त्यांचे कुटुंबीय न्याय मागत आहेत.

या सर्व प्रकरणांमध्ये, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि म्हणूनच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे, जेणेकरून ही प्रकरणे पुढील प्रक्रियेशिवाय रखडू नयेत, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT