Mumbai News : राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग आहे. मात्र, तीन पक्षात फारसे सख्य नसल्याने नेहमीच या-ना त्या कारणाने खडाजंगी पाहवयास मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून भाजप व शिवसेनेत एकमेकांच्या पक्षातील नेतेमंडळी फोडण्यावरून कोल्ड वॉर पुढे आले होते. आता भाजपने पालघरमध्ये ऑपरेशन लोट्स राबवले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यामुळे हा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षातील वाद चिघळण्याची शक्यता अधिक आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी ठाणे आणि आजूबाजूच्या भागात शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची फोडाफोडी झाली होती. त्यानंतर वाद टोकाला पोहोचताच एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत असे दोन्ही पक्षात अलिखित ठरले होते. पण आता रविंद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार श्रीनिवास वनगा यांना भाजप प्रवेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्षात वाद चिघळला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपचा धक्का वगैरे काही नाही, आम्ही टांगा पलटी करतो हे माहिती आहे ना? असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी भाजपला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील या दोन पक्षातील वाद चिघळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.