Pankaja munde, Devendra Fadanvis, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra BJP: बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला; नेत्यांची तब्बल तीन तास बैठक

BJP Rebels Pacification Plan: अनेक मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षातच लढत होणार आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे हे झालेली बंडखोरी रोखण्यासाठी युद्धपातळीवर दक्षता घेतली जात आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी महायुतीच्या वाट्याला किती जागा येणार याचा वाद शेवटपर्यंत मिटवता आला नाही. एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त मित्र पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात महायुतीच्या मित्र पक्षातच लढत होणार आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने भाजप नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे हे झालेली बंडखोरी रोखण्यासाठी युद्धपातळीवर दक्षता घेतली जात आहे.

बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला आहे. त्यासाठी भाजप नेत्यांची तब्बल तीन तास बैठक पार पडली. त्यामुळे आता बंडखोरांसोबत वन टू वन संपर्क साधला जाणार आहे. येत्या काळात नाराजीचे कारण समजून घेत पक्षश्रेष्ठी बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. (BJP News)

बोरिवली पूर्वमधून उभे असलेल्या माजी खासदार गोपाळ शेट्टींसोबतही यावेळी चर्चा केली जाणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गोपाळ शेट्टींसोबत चर्चेची जबाबदारी विनोद तावडेंकडे (Vinod Tawade) देण्यात आली आहे. त्यामुळे ते चर्चा करून हा वाद मिटवतील अशी शक्यता आहे.

भाजपने (BJP) बुधवारपासूनच बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले जात आहे. त्याठिकाणी वरिष्ठ नेतेमंडळींकडून नाराजीचे कारण जाणून घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, भाजपमधील अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या बंडखोरांना येत्या काळात शांत करण्याचे आव्हान असणार आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपला बंड थंड करण्याचं आव्हान असणार आहे.

त्यामुळे 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे भाजप नेत्याकडून हे बंड मोडीत काढण्यासाठी 4 तारखेपर्यंत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT