Mahayuti News : महायुतीत बंडोबा वाढले, समजूत काढताना दमछाक होणार

Ahilyanagar Election: विधानसभा निवडणुकीत नेवासा आणि श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीची चिन्हं वाढलीत.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून आणि उमेदवारी निश्चित करण्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. बंडखोरीची अधिक शक्यता आहे.

श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील गोंधळ मिटले नाही. उलट अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.

नेवासा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील दोन पक्षांनी आपपाल्या उमेदवारांना 'AB' फॉर्म दिल्यानं गोंधळ निर्माण झाला आहे. नेवासा मतदारसंघात महायुतीमधील भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे. त्यांनी 'AB' फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून अब्दुल शेख यांनीही 'AB' फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला. तसंच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील बंडखोरीची तयारी केली आहे.

Mahayuti News
Mahayuti News : महायुतीमधील शिवसेनेचा अन् राष्ट्रवादीचा उमेदवार 'या' मतदारसंघात एकमेकांविरोधात भिडणार? माघारीकडे लक्ष

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसने (Congress) तिकीट कापल्यानंतर आमदार लहू कानडे यांनी महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'AB' फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील 'AB' फॉर्मसह अर्ज भरला आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी देखील अर्ज भरला आहे.

Mahayuti News
Pawar Vs Shinde : भाजप आमदार शिंदे कशात 'पटाईत'; आमदार पवारांनी भरगच्च सभेत सगळं सांगितलं

शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार आमने-सामने

या दोन्ही जागा महायुती आणि 'मविआ'साठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवलंय. त्यामुळे महायुतीत लोखंडे यांना कोणता शब्द मिळतो, किंवा लोखंडे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

आमदार कानडे आणि माजी आमदार कांबळे दोघेही इच्छुक आहे. त्यांनी प्रचाराला सुरवात देखील केली आहे. या दोघांचे उमेदवारांचे 'AB' फॉर्म पाहिल्यास कांबळेंचा शिंदेंच्या शिवसेनेचा आणि कानडेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा. राज्याचा कारभारात शिंदे आणि पवारांचे जास्त जुळलं नाही. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये काय होणार, यायचीच जास्त चर्चा आहे.

भाजपचे मुरकुटे निर्णायक भूमिकेत

नेवाशात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे महायुतीमधून इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकरली. त्यामुळे त्यांनी प्रहार, भाजप, शिवसेना आणि अपक्ष, असे चार अर्ज दाखल केलेत. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना ऐनवेळी महायुतीने शिवसेनेच्या चिन्हांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. हा प्रयोग महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना कितपत रुचला हा संशोधनाचा विषय बनला आहे. या निर्णयाचे स्पष्टीकरण दोन्ही बाजूकडून स्थानिक नेते वरिष्ठांकडे मागत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com