Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : भाजपकडून एकनाथ शिंदेंचा 'करेक्ट कार्यक्रम', दिल्लीवारी देखील ठरली फेल?

Mahayuti BJP Vs Eknath Shinde : विधान परिषदेच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला समोर आला आहे. या फाॅर्म्युल्यानुसार शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत.

Roshan More

Eknath Shinde News : 'स्थानिक' विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये 11-4-2 चा फाॅर्म्युला ठरला आहे. या फाॅर्म्युल्यानूसार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.

एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच 7 जागांसाठी आग्रही होते. त्यांची राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती. मात्र तोडगा न निघाल्याने त्यांनी सरळ दिल्ली गाठली. मात्र, समोर आलेल्या जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यामुळे शिंदेंना दिल्लीतून मोकळ्या हातानेच परत यावे लागल्याची चर्चा आहे.

त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदेंचा 'स्थानिक'च्या निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' केला असल्याची चर्चा आहे. जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. मात्र, तीन जागांवर दावा सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. पुणे आणि रायगड या दोन जागा त्यांच्याकडे असतील, अशी सुत्रांची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंना कोणत्या जागा?

ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. एकनाथ शिंदे ठाण्याची जागा आपल्याकडे ठेवण्यावर ठाम आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगरची देखील जागा हवी आहे. या दोन्ही जागा शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी भाजपची वाढलेली ताकद ही शिवसेनेची डोकेदुखी ठरणार आहेत. स्थानिक नेते या जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे शिंदेंना नेमक्या कोणत्या चार जागा मिळणार यावर देखील चर्चा होत आहे.

रायगडमध्ये धक्का?

रायगडच्या जागेसाठी भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत होते. भरत गोगावले यांना ही जागा आपल्या मुलासाठी तर महेंद्र दळवींना ही जागा आपल्या मुलीसाठी हवी होती. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील या जागेसाठी ताकद लावली होती. आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला माघार घ्यावी लागल्याचे चित्र आहे. मात्र, वरिष्ठांच्या निर्णयावर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे नाराज आहेत. त्यांच्या मुलीने कालच अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT