Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Video BJP Politics : शिंदे गटाला 70 तर भाजपला 160 जागा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबावतंत्र

Maharashtra Assembly Election 2024 BJP Shivsena : भाजपने काही झाले तरी 160 पेक्षा कमी जागा लढू नयेत, यासाठी स्थानिक भाजप नेते आग्रही आहेत.2019 विधानसभा निवडणुकीत भाजप 152 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढली होती.

Roshan More

BJP Politics : भाजप महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेसाठी 100 जागांची मागणी भाजपकडे केली होती. मात्र, शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर 2019 पेक्षा कमी जागा भाजपला लढाव्या लागतील. त्यामुळे 160 जागांपेक्षा कमी जागांवर भाजपने लढू नये. 160 ते 170 जागा भाजपने लढणे योग्य ठरेल, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरल्याची माहिती आहे.

शिंदे गटाने 70 तर, अजित पवार गटाने 58 तर भाजपने 160 जागा लढाव्यात, असा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांसमोर महाराष्ट्र प्रदेश नेत्यांचा ठेवल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा BJP शिंदे गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिला. 15 जागा लढत शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काॅन्फिडन्स वाढलेल्या शिंदे गटाकडून विधानसभेसाठी 100 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, भाजपने काही झाले तरी 160 पेक्षा कमी जागा लढू नयेत, यासाठी भाजप स्थानिक नेते आग्रही आहेत.

अजित पवारांमुळे गणित बिघडले

2019 विधानसभा निवडणुकीत भाजप 152 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढली होती. 12 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या होत्या. यंदा मात्र जागा वाटपात महायुतीत अजित पवारांचा Ajit Pawar असल्याने त्यांना देखील जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे महायुतीचे जागा वाटपाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या 100 जागांची मागणी मान्य केली तर भाजपला 120 ते 130 जागांवर लढावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT