Raosaheb Danve sarkarnama
महाराष्ट्र

'मविआ'चे २५ आमदार भाजपच्या संपर्कात; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला : दानवेंचा गौप्यस्फोट

Raosaheb Danve | BJP | Mahavikas Aaghadi : रावसाहेब दानवे यांचा वाढदिवसादिवशी गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

जालना : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. पण अजूनही ते भाजपच्या संपर्कात आहेत. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असा गौप्यस्फोट करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी खळबळ उडवून दिली आहे. रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि धुळवड आज साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

हे आमदार कोण असे त्यांना विचारले असता दानवे म्हणाले, जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असे सांगत त्यांनी प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला आहे. दानवेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडली असून भाजपच्या संपर्कात असलेले नाराज आमदार कोण याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

आज संजय राऊत यांनी भाजपचा भगवा रंग भेसळीचा आहे अशी टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले, भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांच्यात हे त्यांनी पहावं. पण भेसळीचा अर्थ दोन ते तीन जण एकत्र आले की होते. महाराष्ट्रात ३० वर्ष भाजप-शिवसेनेला एकत्र भगव्यावर आणि अलिकडे मोदींच्या फोटोवर लोकांनी मतदान केले. पण आता ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता हिरव्याचं समर्थन करतात ते. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा, भगवा करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT