भाजपचा उमेदवार ठरला; कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढवणार!

महादेवराव महाडिक यांचे भाचे देणार महाविकास आघाडीला आव्हान | Kolhapur | Kolhapur North | Satyajeet Kadam |
Satyajeet Kadam News, Kolhapur election News, Nana Kadam News
Satyajeet Kadam News, Kolhapur election News, Nana Kadam NewsSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (bjp) सत्यजित ऊर्फ नाना कदम यांची उमेदवारी आज (१८ मार्च) निश्चित झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दुपारी त्यांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सत्यजित कदम यांच्याकडून वेगवेगळ्या भागातील नेते-कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणे सुरू आहे. (BJP confirms Satyajit Kadam's candidature for Kolhapur North by-election)

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून (१७ मार्च) सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ मार्च आहे. तर मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. (Satyajeet Kadam News)

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात बुधवारी (१६ मार्च) मुंबईत विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. या बैठकीत पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण उमेदवार द्यायचा, यावर चर्चा झाली. निवडून येण्याची क्षमता, संपर्क आणि इच्छुकांची तयारी याचाही आढावा घेण्यात आला.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, दौलत देसाई, सचिन तोडकर आदींनी उमेदवारीची मागणी केलेली होती. पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. महाडिक यांनी इच्छुकांची यादी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली होती. याच यादीवर फडणवीस, पाटील आणि इतर नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर सत्यजित कदम यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली आहे.

सत्यजित कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. दोन महिन्यांपूर्वी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिल्यानंतर कदम यांनी तयारी सुरु केली होती. कदम यांना आता सध्या महाडिक गट, कोरे गट, आवाडे गट यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवाराला आव्हान देण्यासाठी भाजपाने तडगी फिल्डिंग लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com