BJP questions INDIA Bloc after Uddhav Thackeray was seated in the last row during Delhi meeting. sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray vs BJP : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना अपमान? शेवटच्या रांगेत जागा, भाजपने डिवचले, 'हातात पडलं काय...'

INDIA Meeting Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

Roshan More

Uddhav Thackeray News : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हे देखील आहेत. या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ आहे, याचे प्रेझेंटेशन केले. मात्र, या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगत बसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

बैठकीतील उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी आपणाची शेवटची रांग असे म्हणत डिवचले आहे.तर,भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मला नाही अब्रू, मी कशाला घाबरु...असे म्हणत ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले आहेत की, 'भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, किती सन्मान होता मातोश्री व उध्दव ठाकरे यांना. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. आणि आता कट टू २०२५ पहा.'

'महाविकास आघाडीत आल्यापासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसने हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही. दरवर्षी आता उध्दव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात हिंदुत्व सोडल विचारधारा सोडली त्यातून मान गेला सन्मान गेला हातात पडलं काय तर आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग.', असा टोला देखील उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला.

कोणी कुठेही बसले...

उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत जागा दिल्याची टीका भाजप करत असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अगदीच हस्यास्पद आहे आणि बालीश आरोप आहे. इन्फाॅर्मल गेटटूगेदर होतं. कोणी कुठेही बसलं होतं. तो काय प्रोटोकाॅलचा कार्यक्रम नव्हता. अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत बसले होते पवार साहेब दुसऱ्या का तिसऱ्या रांगते बसले होते. आम्हाला सह कुटुंबा एकत्र जेवणासाठी बोलावलं होतं. ज्या जिथे वाटलं तेथे तो बसला. तो सरकारी कार्यक्रम नव्हता. घरगुती कार्यक्रम होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT