
Details of the fraud case involving Girish Mahajan's fake relative: आपण गिरीश महाजन यांचा पुतण्या असून पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकाने एका तरुणीची तब्बल ८ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. या प्रकारात गिरीश महाजन यांच्या नावाचा चुकीचा वापर करण्यात आल्याने तत्काळ संबधितास अटक करण्याची मागणी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी केली आहे.
याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अभिषेक पाटील याच्यावर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने केवळ गिरीश महाजनच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप बनकर यांच्याशी देखील आपली जवळीक असल्याचे खोटे सांगत फसवणूक केली.
या याप्रकरणी औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार हिने (१९) सायखेडा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की, अभिषेक पाटील हा आमच्या घरी वारंवार येत असे, त्याने आपण स्वत:ला गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचं सांगितलं.
माझ्या कुटुंबाशी त्याने जवळचे संबंध तयार केले. त्यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर आपल्याला पोलिस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने स्वाती व तिच्या आईला मुंबईत नेले, तिथे दादरला काही दिवस ठेवले. तिथे तिला नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली. नंतर अॅकॅडमीत प्रवेश दिला व आठ लाख रुपयांची मागणी केली. यापैकी स्वातीच्या आईने चार लाख रुपये त्याला लग्नासाठी दिले.
अभिषेक पाटील याने खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपले जवळचे संबंध असल्याचे खोटे भासवले. इतकच नाही तर निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या नावाचा स्टॅम्प पेपरही दाखविला.
त्यामुळे आई व स्वातीला दोघांनाही त्याच्यावर विश्वास बसला. त्याचाच फायदा त्याने घेतला. त्याने स्वातीला काही दिवसांनी खोटी नेमप्लेट व गणवेश दिला. स्वातीला तू पोलिस झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्वातीच्या बहिणीलाही कुंभमेळा समन्वयक झाल्याचे खोटे सांगितले.
दरम्यान औरंगपूरसह परिसरात सोनाली व अभिषेक चे फोटोसह बॅनर लावण्यात आले. हे बॅनर तिच्या मामाने बघितल्यानंतर अभिषेकची त्यांनी चौकशी केली. त्यानंतर अभिषेक पाटील हा गिरीश महाजन यांचा पुतण्या नाही व त्याच्याकडे काही पदही नाही असे लक्षात आले.
त्यातून पाटील याने आपली फसवणूक केल्याचे स्वाती व तिच्या कुटुंबाच्या लक्षात आले. या प्रकणात गिरीश महाजन यांच्या नावाचा गैरवापर झाला आहे, त्यामुळे अभिषेक पाटील याला तत्काळ अटक करण्याची मागणी भाजपचे यतीन कदम यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.