Maharashtra political controversy : छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शन होत आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री ते मंत्र्यांपर्यंत सर्वच या मागणीला पाठिंबा देत आहे.
राज्यात बाबरीची पुनरावृत्ती करण्यासाठी, कार सेवा बजावण्याचा विश्व हिंदू परिषद अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते इशारा देत आहे. यातून राज्यात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबासारखा व्हिलन होता, म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे विधान केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानाचा आता हिंदुत्ववादी (Hindu) संघटनांकडून वेगळाच अर्थ काढून टीका होऊ लागली आहे. हिंदुत्वादी कार्यकर्ते यावर अधिक आक्रमक होत, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अधिक जोमाने करू लागले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
"औरंगजेबाची कबर उद्धवस्त करायची आहे. म्हणजे काय कराचयं आहे, यावर कोणी काय बोलत नाही. रोज तेच-तेच बोलले जात आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक प्रश्न आहेत. शांतता-सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. त्यावर कोणी बोलत नाही. केवळ दररोज औरंगजेबावर बोललं जात आहे. इतिहासातून औरंगजेब काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून, शिवाजी महाराज हिरो झाले", असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाची ही कबर हटवण्याच्या मागणी मागे बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा छुपा अजेंडा महायुती सरकारमधील भाजपचा आहे, असा तिखट हल्ला चढवला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना यातून फूस लावली जात आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले.
इतिहास हा इतिहास असतो, रावणाला बाजूला करून रामायण सांगता येणार नाही. प्रतापगडाची लढाईतून अफजल खान बाजूल करून पाहा. ती लढाई सांगता येणार नाही. दुसऱ्या महायुद्धातून हिटलरला बाजूला केल्यास ते युद्ध सांगता येणार नाही, असे सांगत राज्यात आता जे काही चालू आहे, त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.